…म्हणून कोरोनाची दुसरी लाट आली; भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचा दावा

कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार उडाला आहे. प्रत्येक भारतीय ही लाट ओसरण्याची प्रतीक्षा करीत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी स्थलांतरित कामगार जबाबदार आहेत. तसेच धार्मिक कार्यक्रमांमुळेही त्याचा विस्तार झाला, असा दावा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने आपल्या एका संशोधनात केला आहे.

    दिल्ली : कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार उडाला आहे. प्रत्येक भारतीय ही लाट ओसरण्याची प्रतीक्षा करीत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी स्थलांतरित कामगार जबाबदार आहेत. तसेच धार्मिक कार्यक्रमांमुळेही त्याचा विस्तार झाला, असा दावा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने आपल्या एका संशोधनात केला आहे.

    प्रारंभीच्या काळात कोरोना संक्रमणाचा प्रसार होण्याची मुख्य कारणे प्रवासी कामगार आणि धार्मिक कार्यक्रम असू शकतात, असा दावा आयसीएमआरच्या अहवालात करण्यात आला आहे.

    जानेवारी 2020 ते ऑगस्ट 2020 मधील सार्स सीओव्ही 2 च्या क्रमाच्या विश्लेषणामुळे स्पाइक प्रोटीनमध्ये ई 484 क्यू म्यूटेशन दिसून आले, असे अहवालात म्हटले आहे. देशात कोरोना विषाणू बी 1.1.7, व्हिएरिएंट ऑफ कॉन्सर्ट आणि बी 1.351 चे तीन प्रकार आढळले आहेत. या प्रकारांबद्दलची परिस्थिती चिंताजनक होती. कारण ते रोगाचा प्रतिकार करण्याची क्षमता कमी करतात.