कोरोनामुळे अर्थव्यवस्थेची विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्यासाठी ‘नोटा’ छापण्याची गरज आहे – उदय कोटक

केंद्र सरकारने प्रत्येकाला मदत करणं गरजेचे आहे. संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत करावी जेणेकरून अर्थव्यवस्थेवर जास्त परिणाम होणार नाही. त्याचसोबत कोरोनाच्या संकटकाळात अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असल्याने बँकानांही त्रास सहन करावा लागत आहे. सरकारच्या पाठिंब्याने कर्जदारांनाही दिलासा देता येऊ शकतो.

    नवी दिल्ली: कोरोनाच्या संसर्गाचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसला आहे. गेल्यावर्षाभरापासून अनेक उद्योग व्यवसाय ठप्प झाले आहेत. साहजिक देशाची अर्थव्यवस्थेची घडली विस्कटली आहे. त्यामुळे ही अर्थव्यवस्थेची विस्कटलेली घडी नीट बसवायची असेल तर नोटा छापण्याची गरज आहे असे मत भारतीय उद्योग संघटनेचे अध्यक्ष उदय कोटक यांनी व्यक्त केले आहे.

    केंद्र सरकारने या कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी तळागाळातील लोकांना थेट मदत करणे आवश्यक आहे. सर्वाधिक फटका बसणाऱ्या क्षेत्रातील लोकांच्या नोकऱ्या वाचवायला हव्यात. सरकारने गरिबांच्या हातात पैसे द्यावेत. यावर जीडीपीचा १ टक्का खर्च करावा लागेल. त्याचा फायदा सर्वसामान्यांना होईल असा विश्वास कोटक महिंद्रा बँकेचे संचालक असलेल्या उदय कोटक यांनी व्यक्त केला आहे.

    आता सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(RBI)च्या मदतीनं बँलेन्स शीटचा विस्तार करायला हवा. सरकारने व्यावसायिक सुधारणा करण्याचा विचार करावा. व्यवसाय दोन प्रकारचे आहेत. पहिलं महामारीमुळे ज्या क्षेत्रात बदल आवश्यक आहे तो आणि दुसरा म्हणजे ज्यांचं व्यावसायिक मॉडेल बदलल्यामुळे ते काम करू शकत नाहीत. त्यासाठी केंद्र सरकारने प्रत्येकाला मदत करणं गरजेचे आहे. संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत करावी जेणेकरून अर्थव्यवस्थेवर जास्त परिणाम होणार नाही. त्याचसोबत कोरोनाच्या संकटकाळात अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असल्याने बँकानांही त्रास सहन करावा लागत आहे. सरकारच्या पाठिंब्याने कर्जदारांनाही दिलासा देता येऊ शकतो, विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.