देशात मृत्युचे थैमान सुरूच, गेल्या २४ तासांत ३६४६ जणांचा मृत्यू, दैनंदिन नव्या रुग्णांचा आकडा ४ लाखांच्या दिशेने

देशात गेल्या २४ तासांत ३६४६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. आतापर्यंत २४ तासांत झालेले हे सर्वाधिक मृत्यू आहेत. तर देशात नवे कोरोना रुग्ण आढळण्याचा सिलसिलाही वाढत चाललाय. दररोज सापडणाऱ्या कोरोना रुग्णांचा आकडा गेल्या आठवड्यात ३ लाखांच्या वर पोहोचला होता. तो आता ४ लाखांच्या दिशेनं प्रवास करत असल्याचं चित्र आहे. गेल्या २४ तासात देशात ३ लाख ७९ हजार नवे कोरोना रुग्ण आढळलेत. 

    देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत नाही. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढच होत असल्याचं चित्र देशात दिसतंय. त्याचप्रमाणं कोरोना रुग्णांच्या मृत्युचं प्रमाणही वाढत चाललंय. गेल्या २४ तासांत झालेल्या कोरोना रुग्णांच्या मृत्युच्या संख्येनं नवं रेकॉर्ड प्रस्थापित केहजलंय.

    देशात गेल्या २४ तासांत ३६४६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. आतापर्यंत २४ तासांत झालेले हे सर्वाधिक मृत्यू आहेत. तर देशात नवे कोरोना रुग्ण आढळण्याचा सिलसिलाही वाढत चाललाय. दररोज सापडणाऱ्या कोरोना रुग्णांचा आकडा गेल्या आठवड्यात ३ लाखांच्या वर पोहोचला होता. तो आता ४ लाखांच्या दिशेनं प्रवास करत असल्याचं चित्र आहे. गेल्या २४ तासात देशात ३ लाख ७९ हजार नवे कोरोना रुग्ण आढळलेत.

    महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या अजूनही सर्वाधिकच आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत तब्बल ९८५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. गेल्या २४ तासांत ६३ हजार ३०९ नवे कोरोना रुग्ण आढळून आलेत. तर तितक्याच कालावधीत ६१ हजार १८१ रुग्णांना डिस्चार्जही देण्यात आलाय. राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता ४४ लाख ७३ हजार ३९४ एवढी झालीय.

    कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं लॉकडाऊनची मुदत आणखी १५ दिवसांनी वाढवण्याचा निर्णय घेतलाय. महाराष्ट्रात पुढच्या ६ महिन्यात लसीकरण प्रक्रिया पूर्ण करायची असेल, तर दर महिन्याला २ कोटी नागरिकांचं लसीकरण होणं गरजेचं आहे.