प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

दिवसभर चलनी नोटा बर्‍याच लोकांच्या हातातून जातात. देशभर पसरलेल्या कोरोनाच्या संकटात लोकांमध्ये या नोटांद्वारे कोरोना विषाणूचा प्रसार देखील होतो की काय याची चिंता होती. व्यापाऱ्यांची सर्वात मोठी संघटना कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने भारतीय रिझर्व्ह बँक (RBI), इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि देशाचे आरोग्य मंत्री यांना गेल्या 9 महिन्यांपासून हा प्रश्न विचारला आहे … पण CAIT च्या या प्रश्नावर अद्याप कुणीही उत्तर दिलेले नाही, असा आरोप आहे.

दिल्ली (Delhi).  दिवसभर चलनी नोटा बर्‍याच लोकांच्या हातातून जातात. देशभर पसरलेल्या कोरोनाच्या संकटात लोकांमध्ये या नोटांद्वारे कोरोना विषाणूचा प्रसार देखील होतो की काय याची चिंता होती. व्यापाऱ्यांची सर्वात मोठी संघटना कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने भारतीय रिझर्व्ह बँक (RBI), इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि देशाचे आरोग्य मंत्री यांना गेल्या 9 महिन्यांपासून हा प्रश्न विचारला आहे … पण CAIT च्या या प्रश्नावर अद्याप कुणीही उत्तर दिलेले नाही, असा आरोप आहे.

सरकारला मदत करण्याच्या उद्देशाने आम्ही ही माहिती शोधत आहोत, पण उत्तर देण्यास कोणाकडेही वेळ नाही, असेही कॅटने म्हटले आहे. त्याचवेळी आरबीआयने सांगितले की, थेट उत्तर देण्याऐवजी आम्ही लोकांना डिजिटल पेमेंट करण्याचे मार्ग सुचवित आहोत.

तीन वेळा पत्र पाठविले; पण उत्तर मिळाले नाही
9 मार्च 2020 रोजी कॅटने केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना पत्र पाठवून चलनी नोटांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होऊ शकतो का असा विचारला होता. त्याच वेळी, 18 मार्च 2020 रोजी कॅट यांनी इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे डायरेक्टर डॉ. बलराम भार्गव यांनाही आणखी एक पत्र पाठवले होते आणि त्यांना तोच प्रश्न विचारला होता आणि कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानंतर पुन्हा जुलै आणि सप्टेंबरमध्ये या दोघांनाही या प्रकरणाशी संबंधित प्रश्न विचारताना त्यांना स्पष्ट माहिती देण्यास सांगितले. देशभरातील व्यापारी चलनी नोटांच्या माध्यमातून मोठ्या संख्येने व्यापार करतात आणि सर्वसामान्य लोकं चलनी नोटा देखील मोठ्या प्रमाणात वापरतात, परंतु नऊ महिन्यांनंतरही आजपर्यंत कॅटला याबाबत उत्तर आलेले नाही.