CBSE परीक्षांवर कोरोनामुळे ‘सस्पेन्स’

सीबीएसईकडून घेण्यात येणाऱ्या बोर्ड परीक्षांसाठी फक्त 3 आठवडे उरले आहेत. देशात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. अशातच इयत्ता 10वी व 12वीच्या एक लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी याचिकांवर हस्ताक्षर करून सरकारला 4 मेपासून सुरू होणाऱ्या बोर्ड परीक्षांना रद्द करणे किंवा ऑनलाईन करण्याची विनंती केली आहे.

    दिल्ली : सीबीएसईकडून घेण्यात येणाऱ्या बोर्ड परीक्षांसाठी फक्त 3 आठवडे उरले आहेत. देशात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. अशातच इयत्ता 10वी व 12वीच्या एक लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी याचिकांवर हस्ताक्षर करून सरकारला 4 मेपासून सुरू होणाऱ्या बोर्ड परीक्षांना रद्द करणे किंवा ऑनलाईन करण्याची विनंती केली आहे.

    गेल्या दोन दिवसांपासून ट्विटरवर हॅशटॅग ‘कॅन्सल बोर्ड एक्झाम 2021’ ट्रेंड होत आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) व कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्सने (सीआयएससीई) सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे व परीक्षेदरम्यान कोरोनाच्या सर्व दिशानिर्देशांचे पालन करण्यात येणार आहे.

    ‘चेंज डॉट ओआरजी’ वरील एका याचिकेमध्ये सांगण्यात आले आहेकी, भारतात परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे. जेव्हा देशात कमी प्रमाणात रुग्ण होते तेव्हा त्यांनी इतर बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या होत्या व आता जेव्हा रुग्णसंख्या अत्युच्च आहे तेव्हा शाळा उघडण्याच्या योजना तयार करण्यात येत आहे. आम्ही शिक्षणमंत्र्यांना या प्रकरणी विचार करणे व यावर्षी होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द करण्याची विनंती करीत आहे. कारण विद्यार्थी आधीच तणावात आहेत.

    विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे व सर्व कोविड-19 नियमांचे पालन करण्यात आले आहे. सामाजिक अंतर सुनिश्चित करण्यासाठी परीक्षाकेंद्रांची संख्या 40 ते 50 टक्के वाढविण्यात आली आहे.