कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्यास कोरोना चाचणी किंवा क्वारंटाईनची गरज नाही; नविन खुलासा

कोरोना प्रतिबंधात्मक लशींचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करण्याची वा क्वारंटाईन होण्याची गरज नसल्याचे मत अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) या संस्थेने व्यक्त केले आहे. दोन्ही डोस घेतलेला व्यक्ती कोरोनाबाधितांच्या संपर्कात आला असला तरी त्याला चाचणीचीही गरज नसल्याचे संस्थेने स्पष्ट केले. लशींबाबत जो संभ्रम पसरला आहे वा घेतल्यानंतर घ्यावयाची काळजी यावरील चर्चांवर सीडीसीने ही माहिती दिली.

    दिल्ली :  कोरोना प्रतिबंधात्मक लशींचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करण्याची वा क्वारंटाईन होण्याची गरज नसल्याचे मत अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) या संस्थेने व्यक्त केले आहे. दोन्ही डोस घेतलेला व्यक्ती कोरोनाबाधितांच्या संपर्कात आला असला तरी त्याला चाचणीचीही गरज नसल्याचे संस्थेने स्पष्ट केले. लशींबाबत जो संभ्रम पसरला आहे वा घेतल्यानंतर घ्यावयाची काळजी यावरील चर्चांवर सीडीसीने ही माहिती दिली.

    कोरोना लस घेतलेल्या व्यक्तींच्या प्रकृतीबाबत नुकतेच एक संशोधन करण्यात आले. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तीला या आजाराचा गंभीर स्वरुपाचा संसर्ग होण्याची शक्यता उरत नाही.

    लस घेतलेल्या व्यक्तीला जर पुन्हा कोरोनाची लागण झाली, तर त्याच्यापासून इतरांना संसर्ग होण्याची खूपच कमी शक्यता असते. कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तीचे स्क्रिनिंग करण्याची गरज नाही, असे सीडीसीने केलेल्या संशोधनातील निष्कर्षात म्हटले आहे.