सिंघूर सीमेवरील दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कोरोनाचे संक्रमण

आतापर्यंत आंदोलनात सहभागी झालेल्या १२ शेतकऱ्यांचा कडाक्याची थंडीमुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे

 

नवी दिल्ली: कृषी कायदयांच्या विरोधात शेतकऱ्यांचे सलग १६ दिवशीही तीव्र आंदोलन आहे. या आंदोलनात कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलीस उपअधीक्षक ( DCP) व अतिरिक्त पोलीस उपायुक्त (ADCP) पदावरील पोलिस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. संबधीत अधिकाऱ्यांवर  डॉक्टारांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत. देशात कोरोनाच्या संसर्गाचा वेग अद्यापही मंदावलेला नाही. अशात शेतकऱ्यांचे आंदोलनात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आरोग्य यंत्रणेकडून व्यक्त केली आहे. मात्र जोपर्यंत कृषी कायदे रद्द केले जाता नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.


आतापर्यंत आंदोलनात सहभागी झालेल्या १२ शेतकऱ्यांचा कडाक्याची थंडीमुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.. थंडीबरोबरच वाढत असलेले धुरक नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक ठरत असल्याचे दिसून येत आहे. धुरक्यामुळे वायू प्रदुषणामध्येही सातत्याने वाढ होत आहे.