कोरोना प्रतिबंधक लसीकरण आजपासून सुरू, पहिल्या दिवशी इतक्या जणांना मिळणार लस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आजपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेची सुरुवात होणार आहे. सकाळी १०.३० वाजता पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लसीकरण मोहिमेचे उद्घाटन करतील. या मोहिमेची सुरुवात करताना पहिल्या दिवशी लस टोचून घेणार्‍या देशभरातल्या आरोग्य क्षेत्रातील कर्मचार्‍यांसोबत पंतप्रधान संवाद साधण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आजपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेची सुरुवात होणार आहे. पहिल्या दिवशी एकूण २८ हजार जणांना ही लस दिली जाणार आहे. यासाठी देशभरात विविध ठिकाणी २८५ केंद्रं उभारण्यात आलीयत. या मोहिमेची सुरुवात करताना पहिल्या दिवशी लस टोचून घेणार्‍या देशभरातल्या आरोग्य क्षेत्रातील कर्मचार्‍यांसोबत पंतप्रधान संवाद साधण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

याचवेळी मोदी यांच्या हस्ते को-विन (कोविड व्हॅक्सिन इंटेलिजन्स नेटवर्क) या अ‍ॅपचे देखील लोकार्पण करण्याची शक्यता आहे. कोरोनाविरोधी लसीच्या वितरणावर या डिजिटल मंचाच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दिवशी देशभरातील 2934 केंद्रांवर जवळपास 3 लाख आरोग्य कर्मचार्‍यांचे लसीकरण केले जाणार आहे. अशी माहिती एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. प्रत्येक सत्रात कमाल 100 लाभार्थ्यांचे लसीकरण केले जाणार आहे.

महाराष्ट्रातदेखील वांद्रे कुर्ला संकुलात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचं उद्घाटन होणार आहे.

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी आरोग्य कर्मचार्‍यांच्या दिलेल्या आकडेवारीनुसार केंद्र सरकारने कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनच्या 1.65 लाख मात्रा सुरुवातीला घेतल्या आहेत. दररोज 10 टक्के कमी खराब होतील आणि प्रत्येक सत्रात 100 जणांचे लसीकरण करण्यात यावे, असा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना दिला आहे.