corona vaccine update serum institute of india has now prepared 60 million vaccine dose

हैदराबाद :  भारतात तीन ठिकाणी कोरोना लसी अंतिम टप्प्यात आहेत. गुजरात, पुणे आणि हैदराबाद येथे या लशींची निर्मीती होत आहे. या लसीसाठी जगभरातील ६४ देशांचे प्रतिनिधी हैदराबादमधील भारत बायोटेक व बायोलॉजिकल ई च्या दौऱ्यावर आले आहेत.

फायझर, सिरम आणि भारत बायोएनटेकने कोरोना लसीच्या आपत्कालीन लसीकरणासाठी अर्ज केले आहेत. या लसींमुळे आज जगाच्या नजरा भारताकडे आशेने पाहत आहेत.

भारत बायोएनटेक स्वदेशी कोरोना लस कोव्हॅक्सिनवर काम करत आहे. तर, हैदराबादची आणखी एक कंपनी बायोलॉजिकल ई लिमिटेड (बीई) ने जॉन्सन अँड जॉन्सनच्या कोरोना लसीचे उत्पादन वाढविण्यासाठी जॉन्सन फार्मास्युटिका एनव्हीसोबत करार केला आहे.

या लसीचे उत्पादन भारतातही मोठ्या प्रमाणावर केले जाणार आहे. जगभरातील देशांना कमी दरात चांगल्या लसीची प्रतिक्षा आहे. यासाठी त्यांनी भारताकडे कूच केले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने महिनाभरापूर्वी १९० देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना आणि आंतरराष्ट्रीय संघटनांना कोरोना-१९ लसीबाबत माहिती दिली होती. यानुसार पहिल्यांदा या ६४ देशांच्या प्रतिनिधींना हैदराबादला आणले.  यानंतर गुजरात, पुण्यातही नेले जाणार असल्याचीही माहिती आहे.