केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; 11 एप्रिलपासून देशभरात विशेष लसीकरण मोहिम

देशातील खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कार्यालयात कार्यरत 45 वर्षांवरील सर्व कर्मचाऱ्यांना 11 एप्रिलपासून लसीकरण सुरू करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना या संदर्भात पत्र पाठवले आहे. कार्यस्थळावर 100 पेक्षा अधिक इच्छूक लाभ धारक असल्यास करोना लसीकरण आयोजित करावे. त्या कार्यस्थळांना सध्याच्या लसीकरण केंद्राशी जोडण्यात यावे, असे या पत्रात नमुद करण्यात आले आहे.

    दिल्ली : लसीकरणाबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 11 एप्रिलपासून देशभरात विशेष लसीकरण मोहिम सुरु होणार आहे. या मोहिमेअंतर्गत ऑफीसमध्येच कर्मचाऱ्यांना कोरोना लस दिली जाणार आहे.

    देशातील खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कार्यालयात कार्यरत 45 वर्षांवरील सर्व कर्मचाऱ्यांना 11 एप्रिलपासून लसीकरण सुरू करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना या संदर्भात पत्र पाठवले आहे.

    कार्यस्थळावर 100 पेक्षा अधिक इच्छूक लाभ धारक असल्यास करोना लसीकरण आयोजित करावे. त्या कार्यस्थळांना सध्याच्या लसीकरण केंद्राशी जोडण्यात यावे, असे या पत्रात नमुद करण्यात आले आहे.

    खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील मालक अणि व्यवस्थापनाशी चर्चा करुन कार्यस्थळावर लसीकरण सुरू करावे. केवळ कर्मचाऱ्यांनाच या लसीकरणाचा लाभ घेता येणार आहे, त्यांच्या कुटुंबियांनाही त्यात सहभाग करून घेता येणार नाही, असेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.