…तर भारतातून कोरोना संपेल आणि लोकांना मास्कचा वापर करावा लागणार नाही; भारतीय वंशाच्या अमेरिकन डॉक्टरचा दावा

पाच गोष्टींची अंमलबजावणी केली, तर जूनअखेरीस भारतातून कोरोना संपेल आणि लोकांना मास्कचा वापर करावा लागणार नाही. त्याचबरोबर तिसऱ्या लाटेचा काही धोका नसल्याचा दावा भारतीय वंशाचे अमेरिकेतील पेनिसेल्वेनियात डॉक्टर रवि गोडसे यांनी केला आहे.

    दिल्ली : पाच गोष्टींची अंमलबजावणी केली, तर जूनअखेरीस भारतातून कोरोना संपेल आणि लोकांना मास्कचा वापर करावा लागणार नाही. त्याचबरोबर तिसऱ्या लाटेचा काही धोका नसल्याचा दावा भारतीय वंशाचे अमेरिकेतील पेनिसेल्वेनियात डॉक्टर रवि गोडसे यांनी केला आहे.

    जरी कोरोनाची तिसरी लाट आली नाही, तरी लहान मुलांना थोडासा धोका आहेच. आतापर्यंत घरी बसलेली मुले अचानक ग्राऊंडवर खेळायला गेली, तर त्यांना कमी असेना पण काही प्रमाणात धोका असल्याचे ते म्हणाले.

    जनतेला कोरोनाबद्दल दररोज अधिकृत माहिती द्या. मंजुरीच्या प्रतिक्षेत जेवढ्या काही लसी आहेत त्या सर्वांच्या आपत्कालीन वापराला मंजुरी द्या. लसीकरण असेल वा कोरोनाचे उपचार, खासगी क्षेत्रालाही त्याची परवानगी द्या. मोनोक्लोनल प्रक्रियेला प्रोटोकॉलनुसार परवानगी द्या. त्यामुळे कोरोनाचा धोका कमी होईल. सर्वांचे लसीकरण करा अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.