Military assistance in the fight against Corona; Ordinary civilians will be treated at the Army Hospital

शत्रूंशी लढणाऱ्या सैनिकांना वैद्यकीय मदतीद्वारे नवसंजीवनी देणारे हात आता देशातील कोरोनाविरोधातील लढ्यात प्रत्यक्ष मैदानात उतरणार आहेत. देशातील कोरोनाच्या उद्रेकाची स्थिती हाताळण्यासाठी भारतीय सैन्य दलांनी आपल्या निवृत्त वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेसाठी बोलाविले आहे. त्यामुळे देशातील वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, नर्सेससह इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मोठा हातभार लागेल. सैन्याच्या तिन्ही दलांमधून गेल्या दोन वर्षात जे वैद्यकीय कर्मचारी निवृत्त झाले आहेत किंवा ज्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे, अशा लोकांना सैन्य दलांनी पुन्हा बोलाविण्याचा निर्णय घेतला आहे. या कर्मचाऱ्यांना ते ज्या ठिकाणी सध्या राहत आहेत त्याच ठिकाणी नियुक्ती देण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्र सरकारने सोमवारी दिली.

    दिल्ली : शत्रूंशी लढणाऱ्या सैनिकांना वैद्यकीय मदतीद्वारे नवसंजीवनी देणारे हात आता देशातील कोरोनाविरोधातील लढ्यात प्रत्यक्ष मैदानात उतरणार आहेत. देशातील कोरोनाच्या उद्रेकाची स्थिती हाताळण्यासाठी भारतीय सैन्य दलांनी आपल्या निवृत्त वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेसाठी बोलाविले आहे. त्यामुळे देशातील वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, नर्सेससह इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मोठा हातभार लागेल. सैन्याच्या तिन्ही दलांमधून गेल्या दोन वर्षात जे वैद्यकीय कर्मचारी निवृत्त झाले आहेत किंवा ज्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे, अशा लोकांना सैन्य दलांनी पुन्हा बोलाविण्याचा निर्णय घेतला आहे. या कर्मचाऱ्यांना ते ज्या ठिकाणी सध्या राहत आहेत त्याच ठिकाणी नियुक्ती देण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्र सरकारने सोमवारी दिली.

    चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अर्थात सीडीएस जनरल बिपीन रावत यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. ते म्हणाले, या निवृत्त कर्माचाऱ्यांना पुन्हा बोलाविण्याचा निर्णय आम्ही घेतला असून देशातील कोविडची स्थिती हाताळण्यासाठी तयारी आणि कार्यक्रम सुरू केला आहे. गेल्या दोन वर्षात जे वैद्यकीय अधिकारी निवृत्त झाले आहेत त्यांना पुन्हा वैद्यकीय इमर्जन्सीमध्ये काम करण्याची विनंती करण्यात आली आहे.

    त्याचबरोबर सैन्य दलांकडे जे ऑक्सिजन सिलेंडर्स उपलब्ध आहेत ते देखील विविध रुग्णालयांना पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, सीडीएस रावत म्हणाले, विविध रुग्णालयांमध्ये डॉक्टरांच्या मदतीसाठी नर्सिंग कर्मचाऱ्यांना देखील रुजू करण्यात येईल. सैन्याच्या वैद्यकीय पायाभूत सुविधांच्यामधून सर्वसामान्य नागरिकांना गरज पडेल तेव्हा मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.