corona

कडाक्याच्या थंडीत करोनाचा विषाणू मरून जाईल याची अजिबात शक्यता नाही, मात्र थंड तापमानाचा करोना विषाणूवर काय परिणाम होतो याबाबत जगभरात विशेषज्ञ आपले विचार मांडू लागले आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) स्पष्ट केले आहे.

दिल्ली : करोना विषाणूवर (Coronavirus) उन्हाळ्यात प्रतिकूल परिणाम होईल याबाबतच्या साऱ्या आशा मावळल्या आणि आता तर पावसाळा देखील संपणार आहे. आता हिवाळा येत असून या ऋतूत करोना विषाणू कोणता रंग दाखवणार?, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. कडाक्याच्या थंडीत करोनाचा विषाणू मरून जाईल याची अजिबात शक्यता नाही, मात्र थंड तापमानाचा करोना विषाणूवर काय परिणाम होतो याबाबत जगभरात विशेषज्ञ आपले विचार मांडू लागले आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) स्पष्ट केले आहे.

अधिकतर हंगामी विषाणू (Seasonal Virus) हिवाळ्याम्ध्ये सक्रिय होतात. जगभरातील अनेक भागांमध्ये हिवाळ्यामध्ये इन्फ्युएंझाचा प्रकोप वाढताना दिसतो. भारतात आणि समान जलवायू असलेल्या क्षेत्रांमध्ये मान्सून गेल्यानंतर हिवाळ्याची चाहूल लागते. मात्र, आतापर्यंत कोविड-१९च्या कलामध्ये विशेष फरक झालेला दिसत नाही.

मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार जवळपास ७०% सुविधा खुल्या आहेत. अस्थापने व लोकांच्या चळवळीच्या बाबतीतही असे म्हटले जाऊ शकते. की शहराचे भाग अनलॉक झाले आहेत. अशे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले. या आठवड्याच्या सुरुवातीला शहराने रेस्टॉरंट्स मर्यादित पद्धतीने उघडण्यास परवानगी दिली आणि सिनेमा हॉलही सुरु होण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारमधील वरिष्ठ डॉक्टर म्हणाले की, महाराष्ट्रात कोविड पॅटर्नच्या आधारे आतापर्यंत हिवाळ्यातील काही प्रकरणांमध्ये पुन्हा सक्रीय व्हावे, आम्हाला विश्वास आहे की, डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या सुरुवातीला दुसरा पीक शक्य आहे.

विषाणूंमुळे होणारे श्वसनयंत्रणेशी संबंधित आजार थंड तापमानात वाढतात. हा कल संपूर्ण जगात पाहायला मिळतो. याच कारणामुळे फ्लू विषाणूमुळे सर्वाधिक मृत्यू हिवाळ्यात होत असतात. हे पाहता करोना विषाणू हिवाळ्यात आक्राळविक्राळ रुप घेईल का याबाबत तज्ज्ञ आशंका उपस्थिक करत आहेत. मात्र, आतापर्यंत तापमानामुळे करोना विषाणूच्या संसर्गात वाढ झाल्याचे सिद्ध झालेले नाही.

भारतात एकूण सहा ऋतू असून हिवाळ्यात इन्फ्लुएंझाचा प्रकोप वाढताना दिसत नसून तो जून ते सप्टेंबर या काळात वाढतो, असे विशेषज्ञ सांगतात. हे पाहता येणाऱ्या काळात कोविड-१९ चा प्रकोप वाढेल याची शक्यता फारच कमी दिसते. तर दुसरीकडे, पश्चिमेकडील देशांमध्ये थंडीमुळे लोक घरांमध्येच अधिक काळ थांबतात. हे पाहता एकाच ठिकाणी अधिक काळ राहणाऱ्या लोकांमध्ये विषाणूच्या प्रसाराचा धोका अधिक वाढतो.

विषाणूशास्त्रज्ञांच्या (Virologists) म्हणण्यानुसार, भारताच्या बाबतीत विचार करता अशी शक्यता दिसत नाही. भारतात हिवाळ्यात देखील लोक घराबाहेर पडतात आणि भारतीय घरांमध्ये नेहमीच खेळती हवा (Ventilation)असते (भारतात घरांची रचना खेळत्या हवेसाठी उपयुक्त असते). सन २००९ पासूनच H1N1 स्वाइन फ्लूचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये मान्सूनन आणि हिवाळ्यात विषाणू संसर्गात काहिशी वृद्धी झालेली आढळते. मात्र, भारतात देखील पावसाळ्याशी तुलना करता विषाणूंची वाढ हिवाळ्यात मात्र अर्धीच होते.