कोरोनाची तिसरी लाट खरंच ‘किती’ धोकादायक; नेमका कुणाला धोका अधिक ‘जेष्ठ’ की लहान ‘मुले’?

महाराष्ट्रात टास्कफोर्सच्या माहितीनुसार तिसरी लाट महाराष्ट्रासाठी भयंकर असेल असा दावा सर्वेक्षण आणि विश्लेषणाच्या आधारे केला आहे. या लाटेत बाधितांचा उच्चांक प्रतिदिन ८ लाख इतका असेल. तिसऱ्या लाटेत पाच लाख मुलांना संसर्ग होण्याची शक्यता आहे.

    नवी दिल्ली: कोरोनाची दुसरी लाटओसरली असली तरी कोरोनाची तिसरी लाट निर्माण होण्याचा धोका असल्याचे बोलले जात आहे. मात्र खरंच तिसरी लाट किती धोकादायक आहे. याबाबत वैद्यकीय तज्ज्ञाकडून चर्चा केली जात आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका मुलांपेक्षा ज्येष्ठांनाच अधिक असल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटना यांनी एका सर्वेक्षणाच्या आधारावर केला आहे.

    जागतिक आरोग्य संघटना आणि एम्स यांनी ४५०० लोकांच्या डेटाचा अभ्यास केल्यानंतर तिसऱ्या लाटेबाबत भाष्य केले. देशातील काही भागांमध्ये मुलांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्याने तिसऱ्या लाटेचा धोका लहानग्यांपेक्षा मोठ्यांना वा ज्येष्ठांना अधिक असेल, असे या दोन्ही संस्थांचे म्हणणे आहे. या संशोधनानुसार ६५ टक्के लोकांना लहान मुले तसेच १८ वर्षे वयाखालील मुलांना तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचे वाटते तर ३५ टक्के तज्ज्ञांना असा कोणताही धोका मुलांना नसल्याचे वाटते.

    महाराष्ट्रात टास्कफोर्स

    महाराष्ट्रात टास्कफोर्सच्या माहितीनुसार तिसरी लाट महाराष्ट्रासाठी भयंकर असेल असा दावा सर्वेक्षण आणि विश्लेषणाच्या आधारे केला आहे. या लाटेत बाधितांचा उच्चांक प्रतिदिन ८ लाख इतका असेल. तिसऱ्या लाटेत पाच लाख मुलांना संसर्ग होण्याची शक्यता आहे. याचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे मतही फोर्सने व्यक्त केले आहे. याबरोबरच लसीकरणासही सुरुवात केलीअसून , मोठ्या संख्येनं लसीकरण केंद्रे उभारण्यात आली आहेत.

    ऑक्टोबरमध्ये येणार तिसरी लाट ‘रॉयटर्स’ चा दावा
    रॉयटर्सने आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञमंडळी, डॉक्टर्स, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, साथरोग तज्ज्ञ इत्यादींशी चर्चा केल्यानंतर भारतात कोरोनाची तिसरी लाट १०० टक्के येणार असल्याचेमत व्यक्त केले आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यातच या लाटेला सुरुवात होही असा दावा ८५ टक्के लोकांनी केला आहे.