NDA आणि INA मध्ये महिलांना प्रवेश देण्यासाठी न्यायालयीन लढा; सुप्रीम कोर्टाची केंद्राला नोटीस

नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये महिलांना प्रवेश देण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेवर बाजू मांडण्यासाठी सुप्रीम कोर्टाने केंद्राला नोटीस बजावली आहे. नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि इंडियन नावल अकॅडमीमध्ये महिलांच्या प्रवेशाबाबत दाखल झालेल्या जनहित याचिकेवर सुनावणी सुरू होती.

    दिल्ली (Delhi).   नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये महिलांना प्रवेश देण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेवर बाजू मांडण्यासाठी सुप्रीम कोर्टाने केंद्राला नोटीस बजावली आहे. नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि इंडियन नावल अकॅडमीमध्ये महिलांच्या प्रवेशाबाबत दाखल झालेल्या जनहित याचिकेवर सुनावणी सुरू होती. या दोन्ही संस्थांमध्ये महिलांना प्रवेश देण्यात यावा, यासंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये अ‌ॅड. कुश कार्ला जनहित याचिका दाखल झाली होती. यावर सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या बेचसमोर सुनावणी झाली.

    सुप्रीम कोर्टानं याचिकेसंदर्भात संरक्षण मंत्रालय, नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि इंडियन डिफेन्स अकॅडमीला नोटीस बजावली आहे. नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि इंडियन नावल अकॅडमीमध्ये महिलांना प्रवेश नाकारणं हे त्यांच्या मुलभूत अधिकारांवर गदा आणणारे आहे. नागरिक म्हणून महिलांना समान संधी असणं गरजेचे आहे, असे कार्ला यांनी याचिकेत म्हटले.

    सुप्रीम कोर्टान फेब्रुवारी 2020 मध्ये इंडियन आर्मीमध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन आणि पर्मनंट कमिशनमध्ये महिलांना सेवा जॉईन करण्यास मंजुरी दिली होती. त्यानिर्णयाच्या आधारे याचिका दाखल केल्याचे अ‌ॅड. कार्ला म्हणाले.