न्यायालय अवमान प्रकरणी प्रशांत भूषण यांचा सुप्रीम कोर्टीची माफी मागण्यास नकार

मुलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालय ही शेवटची आशा आहे. माझे विधान हे सद्भावनेने होते. आणि मी न्यायालयाकडे माफी मागितल्यास माझ्या विवेकाचा आणि ज्या संस्थेवर माझा विश्वास आहे त्याचा अपमान होईल. असे प्रशांत भूषण यांनी सांगितले.

दिल्ली : प्रसिद्ध विधीतज्ञ प्रशांत भूषण यांनी न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला आहे. प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयात आपले निवेदन सादर केले. यामध्ये प्रशांत भूषण यांनी माझे वक्तव्य सद्भावनापूर्वक होते आणि माफी मागितली तर माझ्या विवेकाचा अपमान होईल. असे सांगितले.

मुलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालय ही शेवटची आशा आहे. माझे विधान हे सद्भावनेने होते. आणि मी न्यायालयाकडे माफी मागितल्यास माझ्या विवेकाचा आणि ज्या संस्थेवर माझा विश्वास आहे त्याचा अपमान होईल. असे प्रशांत भूषण

यांनी सांगितले.

कोर्टाने वक्तव्यावर विचार करण्यासाठी दिला होता वेळ

प्रशांत भूषण यांना वक्तव्याचा पुनर्विचार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दोन दिवसांची मुदत दिली. प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते की त्यांनी न्यायालयात दिलेल्या निवेदनात त्यांनी आपल्या ट्विटबद्दल माफी मागितली नाही. सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत भूषण यांना त्यांच्या विधानावर पुनर्विचार करण्यास सांगितले. यावेळी अटॉर्नी जनरल म्हणाले की प्रशांत भूषण यांना शिक्षा होऊ नये, तर कोर्टाने म्हटले आहे की आम्ही त्याला दोषी ठरविले आहे.

कोर्टाने म्हटले आहे की जे आपली चूक मान्य करतात त्यांना आम्ही सक्ती करत नाहीत. कोर्टाने नंतर आपल्या आदेशात म्हटले आहे की आम्ही प्रशांत भूषण यांना बिनशर्त माफी मागण्यासाठी वेळ दिला आहे, जर ते यास तयार असतील तर त्यांना २४ ऑगस्टपर्यंत माफीनामा सादर करावा लागेल. जर दिलगिरी व्यक्त केली गेली तर आम्ही २५ ऑगस्ट रोजी त्यावर विचार करू.