Covacin is more expensive than Covishield; Bharat Biotech's covacin rates are now fixed following Serum Institute's covshield

कोरोना लसीच्या किमतीवरून राज्य आणि केंद्र सरकारमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड पाठोपाठ आता भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीनचे दरही निश्चित करण्यात आले आहेत. कोव्हॅक्सीन ही लस केंद्र सरकारला १५० रुपये खासगी रुग्णालयांना १२०० आणि राज्यांना ६०० रुपयात विकली जाणार आहे. याशिवाय, परदेशात निर्यात करण्यासाठी लसीची किंमत १५ ते २० डॉलर इतकी निश्चित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्डचे दर निश्चित करण्यात आले होते.

    दिल्ली : कोरोना लसीच्या किमतीवरून राज्य आणि केंद्र सरकारमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड पाठोपाठ आता भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीनचे दरही निश्चित करण्यात आले आहेत. कोव्हॅक्सीन ही लस केंद्र सरकारला १५० रुपये खासगी रुग्णालयांना १२०० आणि राज्यांना ६०० रुपयात विकली जाणार आहे. याशिवाय, परदेशात निर्यात करण्यासाठी लसीची किंमत १५ ते २० डॉलर इतकी निश्चित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्डचे दर निश्चित करण्यात आले होते.

    महागडी लस

    कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सीनची तुलना केल्यास भारत बायोटेकची लस महाग आहे. सरकारच्या निर्देशानुसारच कोव्हॅक्सीन डोसचा दर निश्चित केला असल्याची माहिती भारत बायोटेकने दिली.

    सिरमने ही वाढविले आहेत दर

    सिरम इन्स्टिट्युटचे आदर पूनावाला यांनी नुकतेच कोव्हिशिल्डचे नवे दर जाहीर केले होते. यानुसार राज्य सरकारला कोव्हिशिल्ड ४०० रुपये प्रतिडोस तर खुल्या बाजारात खासगी रुग्णालयांना प्रतिडोस ६०० रुपये दर जाहीर करण्यात आला आहे. कोव्हिशिल्ड लसीचे भारतातील दर हे जगभरातील दरांपेक्षा जास्त असल्याचे देखील समोर आले होते. जगभरात अमेरिका, ब्रिटन, युरोपातील काही देश, बांगलादेश, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका या भागात कोविशिल्ड लसीचा पुरवठा करण्यात आला आहे. मात्र, भारतातील नव्या दरांनुसार लसीचा एक डोस आंतरराष्ट्रीय दरांनुसार ८ डॉलरपर्यंत जाणार आहे. जगात कुठेही कोविशिल्ड लसीच्या डोसची इतकी किंमत नसल्याचं निदर्शनास आले आहे.