cabinet ministers of india

मोदींच्या मंत्रीमंडळातील एकूण 78 मंत्र्यांपैकी 70 मंत्री कोट्यधीश आहेत. प्रत्येक मंत्र्याची सरासरी संपत्ती 16.24 कोटी रुपये होते. 50 कोटींपेक्षा जास्त संपत्ती असणारे चार मंत्री मोदी यांच्या मंत्रिमंडळात सहभागी आहेत. यामध्ये ज्योतिरादित्य शिंदे, पियूष गोयल, नारायण राणे आणि राजीव चंद्रशेखर यांचा समावेश आहे.

    दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार करण्यापूर्वी अनेक विद्यमान मंत्र्यांना राजीनामे मागितले तर अनेकांवर नवी जबाबदारी सोपवली. या मंत्रिमंडळात 78 मंत्र्यांचा समावेश आहे. मोदींच्या मंत्रिमंडळातील 42 टक्के मंत्र्यांवर विविध गुन्ह्याची नोंद आहे. तर 90 टक्के मंत्री कोट्यधीश असल्याची माहिती एडीआरच्या अहवालात देण्यात आली आहे.

    मोदींच्या मंत्रीमंडळातील एकूण 78 मंत्र्यांपैकी 70 मंत्री कोट्यधीश आहेत. प्रत्येक मंत्र्याची सरासरी संपत्ती 16.24 कोटी रुपये होते. 50 कोटींपेक्षा जास्त संपत्ती असणारे चार मंत्री मोदी यांच्या मंत्रिमंडळात सहभागी आहेत. यामध्ये ज्योतिरादित्य शिंदे, पियूष गोयल, नारायण राणे आणि राजीव चंद्रशेखर यांचा समावेश आहे.

    मोदी मंत्रिमंडळातील 8 नेत्यांची संपत्ती एक कोटींपेक्षा कमी आहे. यामध्ये जॉन बारला, प्रतिमा भौमिक, व्ही. मुरालीधरन, रामेश्वर तेली, कैलाश चौधरी, बिश्वेश्वर टूडु, शांतनु ठाकुर आणि निशिथ प्रमाणिक यांचा समावेश आहे. यामध्ये सर्वात कमी संपत्ती नितीश प्रमाणिक यांची आहे. निवडणूक आयोगानुसार नितीश यांची संपत्ती फक्त सहा लाख रुपये इतकी आहे.

    गंभीर गुन्ह्याची नोंद असलेले मंत्री

    अहवालातील माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील अलीपूर मतदार संघाचे खासदार आणि राज्यमंत्री जॉन बरला यांच्यावर 24 गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. गृह राज्य मंत्री निशिथ प्रमाणिक यांच्याविरोधात हत्याचे गुन्हा दाखल आहे. यांच्याविरोधात 21 विविध कलमाअंतर्गत गंभीर प्रकारचे गुन्हे आहेत. व्ही मुरलीधरन, शोभा करंदलाजे, नित्यानंद राय, गिरिराज सिंह , प्रहलाद जोशी आणि नितिन गडकरी यांच्यासह अन्य नेत्यांवर विविध गुन्ह्याची नोंद आहे.