वकिलांच्या वेशात कोर्टात येऊन गुंडांनी काढला मोठ्या गँगस्टरचा काटा, पोलिसांकडून हल्लेखोरांचा एन्काऊंटर

दिल्लीतला मोस्ट वाण्टेड गँगस्टर जितेंद्र(Gangster Jitendra Murder) उर्फ गोगी याची रोहिणी कोर्टात गोळी झाडून हत्या करण्यात आली. रोहिणी कोर्ट (Rohini Court) नंबर २ मध्ये जितेंद्रला हजर केलं असता वकिलांच्या वेशात आलेल्या दोघांनी त्याच्यावर गोळ्या झाडत हत्या केली.

    दिल्लीतील उच्च न्यायालयात(Delhi High Court) गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारामध्ये एका गुंडासह आणि इतर तीन जण ठार झाल्याची (Murder In Court)माहिती मिळाली आहे. या घटनेत काहीजण जखमी झाले आहेत. उत्तर दिल्लीतील रोहिणी येथील कोर्ट कॉम्प्लेक्सच्या आत विरोधी टोळीने जितेंद्र गोगी या कथित गुंडाची हत्या केल्याचे समोर आले आहे. (Police Encounter In Delhi Court) प्रतिस्पर्धी टोळीचे दोन सदस्यही या गोळीबारात मारले गेले आहेत.

    दिल्लीतला मोस्ट वाण्टेड गँगस्टर जितेंद्र उर्फ गोगी याची रोहिणी कोर्टात गोळी झाडून हत्या करण्यात आली. रोहिणी कोर्ट नंबर २ मध्ये जितेंद्रला हजर केलं असता वकिलांच्या वेशात आलेल्या दोघांनी त्याच्यावर गोळ्या झाडत हत्या केली. गोळ्या झाडल्यावर जितेंद्रचा जागीच मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी हल्ला करणाऱ्या दोघांना ठार केलं. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडून हा एन्काऊंटर करण्यात आला. हल्ला करणारे विरोधी गटातील होते असं सांगितलं जात आहे. शूटआऊटमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे.