उध्दव ठाकरेंच्या दिल्लीवारीवर समूह माध्यमांतून उत्सुकता; लंच डिप्लोमसी वरूनही टिपण्या!

काही नेटक-यांनी ता जेवणाच्या टेबलावर नितीशकुमार आणि उध्दव यांच्यासह मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान असल्याबाबत या चौंघात काय लंच डिप्लोमसी झाली असेल असा सवाल केला आहे. तर शहा आणि ठाकरे बाजु बाजूला बसले असल्ने अन्य काही जणांनी दोघांत यावेळी सर्वासमोर काही शिजले की नाही? असा सवाल केला आहे.

    नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजच्या दिल्ली दौ-यात केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांच्या भेटीकडे सा-या राज्याचे लक्ष लागले होते. यावेळी अमीत शहा आणि मुख्यमंत्री जेवणासाठी एकत्र बसल्याच्या छायाचित्रावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. समूह माध्यमांत यापूर्वीच्या काळात शहा यांच्या बंद खोलीत झालेल्या भेटीच्या संदर्भाने टिपण्या केल्या जात असून यावेळी शहा यांनी ठाकरे यांच्यासोबत अन्य राज्याच्या दिग्गज मुख्यमंत्र्यासोबत जेवण घेतल्याने तो चर्चांचा मुख्य विषय राहिला आहे.

    जेवणाच्या टेबलावर आजी माजी भावी?

    काही नेटक-यांनी ता जेवणाच्या टेबलावर नितीशकुमार आणि उध्दव यांच्यासह मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान असल्याबाबत या चौंघात काय लंच डिप्लोमसी झाली असेल असा सवाल केला आहे. तर शहा आणि ठाकरे बाजु बाजूला बसले असल्ने अन्य काही जणांनी दोघांत यावेळी सर्वासमोर काही शिजले की नाही? असा सवाल केला आहे. एकूणच मुख्यमंत्र्याच्या या भेटीतील या छाताचित्रावरून चर्चा होत राहिली आहे.

    छायाचित्राचे कुतूहल

    आठवड्याभरापूर्वी औरंगाबादच्या सभेत मुख्यमंत्र्यानी आजी, माजी आणि भावी सहकारी असा उल्लेख केला होता, त्या संदर्भात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आदी उपस्थित होते. हा संदर्भ घेत काहीनी आजी माजी आणि भावी ही टँगलाईन घेत टिपण्या केल्या आहेत. या छायाचित्रात शिवराजसिंह चौहान उद्धव ठाकरेंकडे काहीतरी बोलताना दिसत आहेत. उद्धव ठाकरेही चौहान त्यांचे बोलणे कान देवून ऐकताना दिसत असून शहा देखील त्यांच्या बोलण्यात गंभीरपणे ऐकत असल्याचे दिसत आहे.

    चर्चा कशावर याबद्दलचे कयास

    त्यावर या नेत्यांमध्ये नेमकी चर्चा कशावर सुरू असावी याबद्दलचे कयास लावले जात आहेत. या नेत्यांमध्ये नक्षलवादी कारवायांवरच चर्चा सुरू असावी असाही त्यातील एक कयास वर्तविला जात आहे. तर काही जणांनी उद्धव ठाकरे हे अमित शहांचे माजी सहकारी आहेत. तर नितीश कुमार आजी सहकारी आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे भावी सहकारी होणार का? असा सवाल करत समूह माध्यमांवर चर्चा रंगल्या आहेत.