महाराष्ट्राला ‘गुलाब’ चक्रीवादळाचा धोका; कोकण आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता

भारताच्या हवामान विभागाने पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्राला 'गुलाब' चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे(Cyclone 'Rose' threatens Maharashtra). ओडिशा आणि आंध्र प्रदेशला चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

    दिल्ली : भारताच्या हवामान विभागाने पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्राला ‘गुलाब’ चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे(Cyclone ‘Rose’ threatens Maharashtra). ओडिशा आणि आंध्र प्रदेशला चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

    हवामान विभागाने सांगितले की, पूर्व मध्य बंगालच्या खाडीत दाब वाढत असून ते चक्रीवादळात बदलू शकते. दक्षिण ओडिसा आणि उत्तर आंध्रप्रदेशाच्या दिशेने जावू शकते. हवामान विभागाने म्हटले की, कोलकाता, पूर्व मिदनापूर, उत्तर 24 परगना आणि दक्षिण 24 परगनासह पश्चिम बंगालच्या अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता आहे.

    बंगालच्या खाडीतून येणाऱ्या या चक्रीवादळाचा तडाखा महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्याच्या काही भागाला बसू शकतो. याठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. रविवारी सांयकाळपर्यंत चक्रीवादळ दक्षिण ओडिशा आणि आंध्रप्रदेशच्या उत्तर किनारपट्टीवरून पुढे सरकेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.