Death machines can cause death to be experienced before death

डॉ. फिलीप यांनी काही वर्षांपूर्वी ॲमस्टरडॅमच्या फ्यूनरल फेअरमध्ये हे डेथ मशीन लोकांसमोर आणले होते. या मशीनमध्ये त्यांनी एक नवीन फीचर जोडले आहेत. याआधी हे यंत्र फक्त जे लोक मरू इच्छितात, त्यांच्यासाठीच होते. पण आता नव्या फीचरमुळे कुणीही व्हर्च्युअलरित्या स्वतःचे मरण पाहू शकेल.

    दिल्ली : भारतात 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने इच्छा मृत्यूला (पॅसिव्ह इथुनेशिया) परवानगी दिली. आपला अखेरचा श्वास कधी घ्यावा, हे ठरविण्याचा अधिकार मरणासन्न व्यक्तीला आहे, असे मत यावेळी न्यायालयाने नोंदविले होते. अमेरिकेतील डॉ. फिलीप निश्के यांनी एक असे मशीन बनवले आहे ज्याच्या माध्यमातून मरणारी व्यक्ती तिचे मरण अनुभवू शकते.

    डॉ. फिलीप यांनी काही वर्षांपूर्वी ॲमस्टरडॅमच्या फ्यूनरल फेअरमध्ये हे डेथ मशीन लोकांसमोर आणले होते. या मशीनमध्ये त्यांनी एक नवीन फीचर जोडले आहेत. याआधी हे यंत्र फक्त जे लोक मरू इच्छितात, त्यांच्यासाठीच होते. पण आता नव्या फीचरमुळे कुणीही व्हर्च्युअलरित्या स्वतःचे मरण पाहू शकेल.

    व्हर्चुअल रिअॅलिटीच्या माध्यमातून एक कृत्रिम वातावरण निर्मिती केली जाते. शरीरातील महत्त्वाचे सेन्सेस प्रभावित करून खरेखुरे वातावरण तयार केले जाते. डॉक्टर फिलीप यांनी 90 च्या दशकात त्यांच्या 4 रुग्णांना मरण्यासाठी इंजेक्शन दिले होते. हे चारही रुग्ण गंभीर आजारांनी ग्रस्त होते आणि ते कधीही बरे होऊ शकणार नव्हते. डॉ. फिलीप यांनी केलेल्या कृत्याला कायद्याने मान्यता होती. यानंतर डॉ. फिलीप यांना डेथ मशीन बनवण्याची प्रेरणा मिळाली.