देशात कोविड- १९ बाधितांच्या संख्येत घट ; मात्र संक्रमित रुग्णांच्या मृत्यूमध्ये वाढ

काळ २४ तासात भारतात नव्याने २ लाख ५९ हजार ५९१ रुग्णांची नोंद झाली आहे. तर एकूण ४ हजार २०९ कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात ३ लाख ५७ हजार २९५ रुग्ण  कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

  नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने कमी जास्त होताना दिसत आहे. गेल्या तीन दिवसांपासून रुग्णांची आकडेवारी वाढ होण्याबरोबरच घट होताना दिसून येत आहे. एका दिवसांपूर्वीच्या रुग्ण संख्येत तब्बल १७ हजारांनी घट झाली आहे. काळ २४ तासात भारतात नव्याने २ लाख ५९ हजार ५९१ रुग्णांची नोंद झाली आहे. तर एकूण ४ हजार २०९ कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात ३ लाख ५७ हजार २९५ रुग्ण  कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

  देशातील एकूण रुग्ण संख्या

  देशात २४ तासात नवे रुग्ण – २,५९,५९१

  देशात २४ तासात डिस्चार्ज – ३,५७,२९५

  देशात २४ सात मृत्यू – ४,२०९

  एकूण रूग्ण – २, ६०, ३१ ९९१

  एकूण डिस्चार्ज – २,२७, १२, ७३५

  एकूण मृत्यू – २,९१, ३३१

  एकूण ॲक्टिव्ह रुग्ण – ३०,२७, ९२५

  आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – १९,१८, ७९, ५०३( Corona Cases in India 24 hours)