arvind kejriwal

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी दिल्ली सरकारनं सहा दिवसांचा लॉकडाऊन(6 days lockdown in delhi) लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सोमवारी (१९ एप्रिल) रात्रीपासून ते २६ एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू असतील.

    दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानेे वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी दिल्ली सरकारनं सहा दिवसांचा लॉकडाऊन(6 days lockdown in delhi) लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सोमवारी (१९ एप्रिल) रात्रीपासून ते २६ एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू असतील. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राज्यातील जनतेला संबोधित करताना ही माहिती दिली.

    दिल्लीत सहा दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करताना अत्यावश्यक सेवा सुरु राहतील अशी माहिती अरविंद केजरीवाल यांनी दिली. तसंच लग्नासाठी फक्त ५० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी असून त्यासाठी पास दिले जातील असं सांगितलं आहे. यावेळी त्यांनी सहा दिवसांचा लॉकडाऊन आहे त्यामुळे कोणीही दिल्ली सोडून जाऊ नका. आम्ही तुमची काळजी घेऊ असं आश्वासन दिलं. तसंच हा लॉकाडाऊन वाढवण्याची गरज भासू नये अशी अपेक्षाही व्यक्त केली.

    दिल्लीत रोज १ लाख चाचण्या होत आहे. आम्ही मृत्यूचे आकडेही लपवले नाहीत. आम्ही आत्तापर्यंत कधीही खोटं बोललो नाही. जी परिस्थिती आहे ती नेहमीच जनतेसमोर ठेवली. दिल्लीत गेल्या २४ तासात २३ हजार ५०० रुग्ण आढळले आहेत. दिवसाला २५ हजार रुग्ण मिळत असतील तर आरोग्य व्यवस्था ढासळेल,असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

    दिल्लीत १०० पेक्षी कमी आयसीयू बेड आहेत. ऑक्सिजनसाठी केंद्र सरकारला पत्र लिहिलं आहे. एका खासगी रुग्णालयाने तर रात्री तीन वाजता ऑक्सिजन संपला होता असं सांगितलं. मात्र वेळीच उपलब्ध झाल्याने खूप मोठी दुर्घटना टळली. औषधांचा तुटवडा जाणवत आहे. या सर्व गोष्टी पाहता दिल्लीमध्ये परिस्थिती गंभीर आहे, असे ते म्हणाले. मात्र लॉकडाऊन वाढवावा लागणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.