smog tower in delhi

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Smog Tower Inauguration By Arvind Kejriwal)  यांच्या हस्ते स्मॉग टॉवरचं आज उद्घाटन झालं आहे. दिल्लीतील कनॉट प्लेस भागातील बाबा खडक सिंह रोडवर हा स्मॉग टॉवर उभारण्यात आला आहे.

    दिल्लीमध्ये(Delhi) प्रदूषणाचे प्रमाण खूप जास्त आहे. दिल्लीतील प्रदूषणाला(Pollution In Delhi) आळा घालण्यासाठी भारतातील पहिल्या स्मॉग टॉवरची(Smog Tower In Delhi) उभारणी दिल्लीत करण्यात आली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Smog Tower Inauguration By Arvind Kejriwal)  यांच्या हस्ते स्मॉग टॉवरचं आज उद्घाटन झालं आहे. दिल्लीतील कनॉट प्लेस भागातील बाबा खडक सिंह रोडवर हा स्मॉग टॉवर उभारण्यात आला आहे. या टॉवरमुळे दिल्लीत प्रदूषण कमी करुन हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे. प्रदूषित हवा आत घेऊन हा टॉवर स्वच्छ हवा बाहेर सोडणार आहे. टॉवरमध्ये १ चौरस किलोमीटर क्षेत्रातील प्रदूषित हवा खेचण्याची क्षमता आहे. तसेच हा टॉवर स्वच्छ हवा १० मीटर उंचीवर सोडणार आहे.

    ऑक्टोबर २०२० मध्ये दिल्ली मंत्रिमंडळाने या योजनेला मंजुरी दिली होती. मात्र कोरोनामुळे टॉवरच्या कामाला उशीर झाला. टॉवरची कार्यक्षमता पाहण्यासाठी दोन वर्षे निरीक्षण करुन त्याचा अहवाल दिल्ली सरकारला सोपवला जाणार आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास काही भागात या टॉवरची उभारणी केली जाणार आहे.

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, “दिल्लीतील प्रदूषण रोखण्यासाठी देशातील पहिल्या स्मॉग टॉवरची उभारणी करण्यात आली आहे. यामुळे १ चौरस किलोमीटरमधील हवेतील प्रदूषण रोखण्यास मदत होणार आहे. हा टॉवर प्रायोगिक तत्वावर उभारण्यात आला आहे. या टॉवरच्या कार्यक्षमता आयआयटी दिल्ली आणि आयआयटी मुंबईच्या माध्यमातून तपासली जाणार आहे”.