दिल्लीतल्या तरुणीसोबत घडला भयानक प्रकार, फेसबुकवरच्या मित्राने वाढदिवसाच्या बहाण्याने तिला हॉटेलमध्ये बोलावलं अन्…..

दिल्लीच्या(Delhi) एका मुलीवर हरियाणामध्ये बलात्कार(Rape In Haryana) झाल्याची एक घटना समोर येत आहे.

    दिल्लीः दिल्लीच्या(Delhi) एका मुलीवर हरियाणामध्ये बलात्कार(Rape In Haryana) झाल्याची एक घटना समोर येत आहे. या तरुणीला तिच्या फेसबुकवर झालेल्या मित्राने(Fecbook Freind Raped Girl) वाढदिवसाच्या बहाण्याने हरियाणातल्या सोनीपत इथं बोलवलं आणि तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार तरुणीने केली आहे.

    ही तरुणी दिल्लीची रहिवासी आहे तर आरोपी हरियाणामधल्या सोनीपतमधल्या मदीना गावचा आहे. पीडितेने पोलिसांना सांगितलं की दोघांची मैत्री फेसबुकच्या माध्यमातून झाली होती. आरोपीने आपल्या वाढदिवसाच्या बहाण्याने पीडितेला सोनीपतमधल्या गीता भवन चौकातल्या एका हॉटेलमध्ये बोलावलं. ती तिथे आल्यावर त्याने तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने अनेकदा विरोध करुनही त्याने जुमानलं नाही, असं पीडित तरुणीचं म्हणणं आहे.

    या घटनेनंतर पोलिसांनी तपास करुन आरोपीला अटक केली आहे. पीडित तरुणीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

    गेल्या काही दिवसांत अनेक बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. राजस्थानच्या धौलपूरमध्ये सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. एका नवविवाहितेवर तिच्याच पतीने काही युवकांकडून सलग दोन दिवस बलात्कार करवून घेतला आहे. यावेळी तोही घटनास्थळी उपस्थित होता. एवढंच नाही, या महिलेने त्यांना विरोध केला असता तिच्या खासगी अवयवांना मिरचीपूड आणि बाम लावून तिला बेशुद्धही करण्यात आलं.