दिल्ली पोलिसांनी AK-47, ग्रेनेड आणि बनावट पासपोर्टसह दहशतवाद्याला अटक

दिल्ली पोलिसांनी सांगितले की, सोमवारी रात्री 9 वाजून 20 मिनिटांनी मोहम्मद अशरफ उर्फ अली नावाच्या पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक करण्यात आली. दिल्लीतील लक्ष्मी नगर परिसरातून त्याला अटक करण्यात आली आहे. अटक कऱण्यात आलेला दहशतवादी मोहम्मद अशरफ हा पाकिस्तानातील पंजाबमधील नरोवल जिल्ह्यात राहणारा असल्याची माहिती समोर आली आहे.

    देशाची राजधानी दिल्लीतून (Delhi) एका पाकिस्तानी दहशतवाद्याला (Pakistani Terrorist) अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने पाकिस्तानी नागरिकत्वाच्या एका दहशतवाद्याला लक्ष्मी नगरमधील रमेश पार्कमधून अटक केली आहे. असे सांगितले जात आहे की, हा दहशतवादी भारतीय नागरिकत्वाच्या बनावट ओळखपत्रासह राहत होता. सध्या या परिसरात शोधमोहीम सुरू आहे. माहिती मिळाली आहे की, या पाकिस्तानी दहशतवाद्याकडून एके-47 रायफलसह 60 राउंड, एक हातबॉम्ब, 50 राउंडसह 2 अत्याधुनिक पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत.

    दिल्ली पोलिसांनी सांगितले की, सोमवारी रात्री 9 वाजून 20 मिनिटांनी मोहम्मद अशरफ उर्फ अली नावाच्या पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक करण्यात आली. दिल्लीतील लक्ष्मी नगर परिसरातून त्याला अटक करण्यात आली आहे. अटक कऱण्यात आलेला दहशतवादी मोहम्मद अशरफ हा पाकिस्तानातील पंजाबमधील नरोवल जिल्ह्यात राहणारा असल्याची माहिती समोर आली आहे.

    दिल्लीत अटक करण्यात आलेल्या या दहशतवाद्याचं नाव मोहम्मद अशरफ अली असल्याचं समजतंय. दिल्ली अली अहमद नुरी नाव धारण करून तो राहत होता. अशरफ अली याला पाकिस्तानच्या आयएसआयकडून दिल्लीसहीत भारताच्या इतर भागांत दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी विशेष ट्रेनिंग देण्यात आल्याचंही सांगितलं जातंय. अशरफ अली याच्याकडून बनावट भारतीय पासपोर्टही जप्त करण्यात आला आहे.

    दहशतवादी मोहम्मद अशरफ यांच्यासोबत आणखी किती लोक आहेत हे जाणून घेण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत. दहशतवादी मोहम्मद अशरफचे साथीदार इतर अनेक ठिकाणी लपले असावेत, असा पोलिसांना संशय आहे.  दिल्ली पोलीस इतरही अनेक ठिकाणी छापे टाकत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी टार्गेट किलिंग करू शकतात. या व्यतिरिक्त, ते सणांच्या दरम्यान लोकांना लक्ष्य करू शकतात. सध्या नवरात्री सुरू आहे. यामुळे मंदिरांमध्येही भाविकांची गर्दी असते.