arvind kejriwal

भारत बंद(bharat band) सुरु असताना आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री व पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल(arvind kejriwal) यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा आरोप केला होता. दिल्ली पोलिसांनी(delhi police) हा आरोप फेटाळून लावला होता. नुकताच पोलिसांनी फोटो आणि व्हिडीओ पोस्ट(delhi police released photo and video) करून याबाबत स्पष्टीकरण केले आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना घरात नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा आरोप आम आदमी पक्षाने मंगळवारी केला होता. पोलिसांनी एक व्हिडिओ पोस्ट करत अरविंद केजरीवाल यांना नजरकैदेत ठेवले नसल्याचं सांगितलं आहे. मंगळवारी रात्री मात्र केजरीवाल यांनी एका पंचातारिक हॉटेलमध्ये लग्नाला हजेरी लावल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलं आहे.

उत्तर दिल्लीच्या पोलीस उपायुक्तांनी केजरीवाल यांना नजरकैदेत ठेवल्याचा हा दावा चुकीचा असल्याचे सांगत त्यांच्या घराबाहेरचा फोटो ट्विट केला होता.  केजरीवाल हे आपल्या घराबाहेर पडत असतानाचे एक फुटेज समोर आले. दुसऱ्या एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये रात्री ९.२५ वाजता पश्चिम विहारमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये एका लग्नासाठी जात असताना दिसत आहेत.

आपचे आमदार आणि समर्थक केजरीवाल यांची निवासस्थानी भेट घेण्यासाठी जात असताना असलेल्या पोलिसांकडून त्यांना अडवण्यात आले.आपच्या लोकांनी खोटी माहिती न पसरवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं होतं. दिल्ली पोलिसांच्या मते केजरीवाल यांच्या घराच्या बाहेर तैनात करण्यात आलेले पोलीस हे त्यांच्या नियमित सुरक्षेसाठी होते.