दिल्लीमध्ये पावसाचा धो धो सुरूच, विमानतळासह अनेक सखाेल भाग जलमय ; 46 वर्षांत पहिल्यांदाच इतक्या पावसाची नोंद

नोएडा, गुरुग्राम आणि फरिदाबादमध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पावसामुळे रस्त्यांवर लांबच लांब वाहतूक कोंडी झाली. पाण्याचा उपसा करण्याची व्यवस्था आणि महानगरपालिकांनी केलेले दावेही मुसळधार पावसामुळे कोलमडले.

    दिल्लीमध्ये काल शुक्रवारपासून मुसळधार पावसाचा धो धो अद्यापही सुरूच आहे. दिल्ली विमानतळासह अनेक सखल भागात पाणी साचले असून रस्ते आणि खड्डे जलमय झाले आहेत.  गाझियाबादच्या इंदिरापुरम येथील शिप्रा सृष्टी सोसायटीजवळ रस्ता खचला.रस्ता खचल्याने मोठा खड्डा झाला. माहिती मिळताच पोलिसांनी बॅरिकेड्स लावून रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. 46 वर्षांत पहिल्यांदाच इतक्या पावसाची नोंद झाल्याचे सांगितलं जात आहे.

    नोएडा, गुरुग्राम आणि फरिदाबादमध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पावसामुळे रस्त्यांवर लांबच लांब वाहतूक कोंडी झाली. पाण्याचा उपसा करण्याची व्यवस्था आणि महानगरपालिकांनी केलेले दावेही मुसळधार पावसामुळे कोलमडले.

    शनिवारी सकाळी दिल्लीत मुसळधार पावसामुळे दिल्ली विमानतळ परिसर आणि शहराच्या इतर भागात पाणी साचले. खराब हवामानामुळे सकाळी पाच उड्डाणे विमानतळावरून वळवण्यात आल्याची माहिती मिळाली. ही उड्डाणे जयपूरकडे वळवण्यात आली आहेत. दुबईहून दिल्लीला येणारे आंतरराष्ट्रीय विमानाच्या मार्गाला बदलून अहमदाबादला पाठवण्यात आले आहे.

    एयरपोर्टच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका आंतरराष्ट्रीय आणि 4 राष्ट्रीय विमाने जयपूर आणि अहमदाबादच्या मार्गवर वळवण्यात आले आहेत. दिल्लीच्या PWDच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या भागांत पाणी शिरले आहे. तेथील पाणी मशीनद्वारे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.