कोरोनाचा संसर्ग झालेल्या 80 टक्के लोकांमध्ये डेल्टा व्हेरिएंट – आयसीएमआर

लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही संसर्गाची माहिती मिळविण्यासाठी आयसीएमआरने हा अभ्यास केला. अभ्यासात एकूण 677 लोकांचा अभ्यासात समावेश करण्यात आला आहे, जे लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेतल्यानंतर पॉझिटिव्ह आढळले होते. 677 लोकांपैकी 592 लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते. 

    नवी दिल्ली : कोरोना व्हायरसविरोधात लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्याची किंवा मृत्यूची शक्यता कमी झाली आहे. आयसीएमआरने अभ्यासात 677 लोकांचा समावेश केला. त्यापैकी केवळ 9.8 टक्के लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागले. लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही संसर्गाची माहिती मिळविण्यासाठी आयसीएमआरने हा अभ्यास केला.

    अभ्यासात एकूण 677 लोकांचा अभ्यासात समावेश करण्यात आला आहे, जे लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेतल्यानंतर पॉझिटिव्ह आढळले होते. 677 लोकांपैकी 592 लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते.

    यापैकी 527 जणांनी कोव्हिशिल्ड लस घेतली होती तर 63 जणांनी कोव्हॅक्सिन लस घेतली होती. तर 85 लोकांना लसीचा एकच डोस देण्यात आला होता. ही माहिती 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतून गोळा करण्यात आली होती.