दिल्लीमध्ये आता फक्त धुकं, धुकं, धुकं…. दिवस उजाडतो, दिसत मात्र काहीच नाही !

पहाटेच्या सुमाराला दिल्लीमध्ये धुक्याचं साम्राज्य पसरतं आणि दुपारपर्यंत कडाक्याची थंडी अनुभवायला मिळते. गेल्या काही दिवसात दिल्लीमध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे थंडीचं प्रमाण कमी झालं होतं. मात्र पुन्हा एकदा ढगांचे आच्छादन हटून दिल्लीमध्ये थंडीचा कडाका वाढायला सुरुवात झाली आहे.

काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर दिल्लीमध्ये पुन्हा एकदा थंडीनं आपलं साम्राज्य पसरायला सुरुवात केली आहे. सध्या दिल्लीमध्ये ४.४ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. दिल्ली आणि परिसरात कडाक्याच्या थंडीने नागरिक हैराण झाले आहे.

दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांपुढे यामुळे मोठं आव्हान निर्माण झालंय. पहाटेच्या सुमाराला दिल्लीमध्ये धुक्याचं साम्राज्य पसरतं आणि दुपारपर्यंत कडाक्याची थंडी अनुभवायला मिळते. गेल्या काही दिवसात दिल्लीमध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे थंडीचं प्रमाण कमी झालं होतं. मात्र पुन्हा एकदा ढगांचे आच्छादन हटून दिल्लीमध्ये थंडीचा कडाका वाढायला सुरुवात झाली आहे. दिल्लीतील आकाश निरभ्र झाल्यामुळे आता थंडी वाढायला सुरुवात झाली असून पुढील काही दिवस दिल्लीतील किमान तापमान हे पाच अंशांच्याही खाली राहू शकतं, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

दिल्लीबरोबरच हिमाचल प्रदेशातदेखील अनेक ठिकाणी बर्फवृष्टी होत असून तेथील किमान तापमान हे शून्य अंशांवर पोहोचले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये देखील गेल्याच आठवड्यात शून्य अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. पुढील काही दिवस दिल्लीतील हा गारवा असाच कायम राहणार असून नागरिक थंडी पळवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करताना दिसत आहेत.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ही थंडी प्रतिकूल असून थंड हवामानात रोगाचा फैलाव अधिक वेगाने होत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्यामुळे आजार पसरू नये आणि विषाणूचा फैलाव अधिक वेगाने होऊ नये, याची खबरदारी घेण्याचं मोठं आव्हान सध्या दिल्लीकरांसमोर आहे.