manish sisodiya

एका पत्रकार परिषदेमध्ये मनीष सिसोदिया(manish sisodiya press conference) यांनी सांगितले की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दारू माफियांना पकडता यावे म्हणून मोठा निर्णय घेतला आहे.(legal age of drinking in delhi is 21) दिल्लीच्या एक्साईज पॉलिसीमध्ये बदल करुन अशा सगळ्या गोष्टी हटवण्यात येत आहेत ज्यामुळे दारू माफियांच्या अवैध धंद्याला चालना मिळेल.

    दिल्लीमध्ये दारू पिण्याचं कायदेशीर वय २१ करण्यात आलं आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आज यासंदर्भात घोषणा केली आहे. तसेच त्यांनी म्हटले आहे की २१ वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तिला दारू विक्रीच्या दुकानात प्रवेश करायची परवानगी नाही. याशिवाय दिल्लीमध्ये दारूविक्रीसाठीचे नवे दुकान उघडले जाणार नाही, अशी घोषणाही त्यांनी केली आहे.

    एका पत्रकार परिषदेमध्ये मनीष सिसोदिया यांनी सांगितले की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दारू माफियांना पकडता यावे म्हणून मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीच्या एक्साईज पॉलिसीमध्ये बदल करुन अशा सगळ्या गोष्टी हटवण्यात येत आहेत ज्यामुळे दारू माफियांच्या अवैध धंद्याला चालना मिळेल.

    उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, दिल्लीमध्ये दारूचे एकसमान वितरण होईल. मात्र कोणतेही नवे दुकान उघडणार नाही. दिल्लीमध्ये सरकारी दारूचे दुकान चालणार नाही. दिल्लीमध्ये दारूचा दर्जा तपासण्यासाठी सरकार क्वालिटी चेकींगची आंतरराष्ट्रीय यंत्रणा उभारणार आहे.