विमानात छायाचित्र काढण्यावर बंदी, डीजीसीएची नवी नियमावली जाहीर

विमानाच्या सुरक्ष-नियमांचे कठोरपणे पालन होण्यासाठी डीजीसीएने स्पाइसजेट कंपनीच्या अधिकाऱ्यावर कारवाई केली आहे. नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) स्पाइसजेटच्या चीफ फ्लाइट ऑपरेशन्स गुरुचरण अरोरा यांना तीन महिन्यांसाठी निलंबित केले आहे.

दिल्ली : डीजीसीएने (DGCA) विमान प्रवास करणाऱ्यांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. या नव्या नियमावलीनुसार प्रवाशांना सरकारी विमानतळे आणि विमानात फोटो काढता येणार नाहीत. (photography on aircraft) काही विशेष प्रकरणांमध्ये परवानगी घेऊन फोटो काढण्याची मुभा मिळू शकेल. त्यासाठी डीजी, जॉईंट डीजी, डेप्युटी डीजी यांची लिखित परवानगी आवश्यक असेल. डीजीसीएने याबद्दल एक आदेश प्रसिद्ध केला आहे. (new regulations) एअरक्राफ्ट नियम १९३७ च्या नियम क्रमांक १३ नुसार कोणत्याही व्यक्तीला विमानतळ किंवा विमानात फोटो काढण्याची परवानगी नाही. केवळ डीजी. जॉईंट डेप्युटी डीजी यांची लिखित परवानगी असल्यावरच एखाद्या व्यक्तीला फोटो काढण्याची मुभा मिळू शकेल. नियमांचे पालन न झाल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा डीजीसीएने दिला आहे.

स्पाईसजेटचा अधिकारी निलंबित

विमानाच्या सुरक्ष-नियमांचे कठोरपणे पालन होण्यासाठी डीजीसीएने स्पाइसजेट कंपनीच्या अधिकाऱ्यावर कारवाई केली आहे. नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) स्पाइसजेटच्या चीफ फ्लाइट ऑपरेशन्स गुरुचरण अरोरा यांना तीन महिन्यांसाठी निलंबित केले आहे. स्पाइसजेटच्या लेखापरीक्षणात डीजीसीएला अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. कोझीकोड विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला होता. त्यानंतर विमान वाहतुकीचे नियमन करणाऱ्या डीजीसीएने देशातील सर्व विमान कंपन्यांचे लेखापरीक्षण सुरु केले आहे. सर्व विमान कंपन्या सुरक्षेच्या नियमांचे पालन करत आहेत का नाहीत, हे पाहणे आमच्यासाठी महत्त्वाचे असल्याचे डीजीसीएच्या अधिकाऱ्याने सांगितले. स्पाइसजेच्या प्रवक्त्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले नाहीत.