Covacin is more expensive than Covishield; Bharat Biotech's covacin rates are now fixed following Serum Institute's covshield

केंद्र सरकारने, जुलै महिन्यापासून देशभरात दररोज 2 कोटी नागरिकांना लस दिली जाईल. डिसेंबरअखेरपर्यंत देशातील सर्वांचे लसीकरण पूर्ण होईल, अशी घोषणा मंगळवारी केली. कोविशिल्ड लस घेण्याच्या कालवाधीत कुठलाही बदल केलेला नाही. कोविशिल्डची पहिली मात्रा दिल्यानंतर 12 आठवड्यांनी दुसरी मात्रा घ्यावी. हा नियम कोवॅक्सिनसाठीही लागू असेल, अशी माहिती आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी दिली.

    दिल्ली : केंद्र सरकारने, जुलै महिन्यापासून देशभरात दररोज 2 कोटी नागरिकांना लस दिली जाईल. डिसेंबरअखेरपर्यंत देशातील सर्वांचे लसीकरण पूर्ण होईल, अशी घोषणा मंगळवारी केली. कोविशिल्ड लस घेण्याच्या कालवाधीत कुठलाही बदल केलेला नाही. कोविशिल्डची पहिली मात्रा दिल्यानंतर 12 आठवड्यांनी दुसरी मात्रा घ्यावी. हा नियम कोवॅक्सिनसाठीही लागू असेल, अशी माहिती आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी दिली.

    देशात लसींचा कुठलाही तुटवडा नाही. जुलैच्या मध्यापर्यंत किंवा ऑगस्टपर्यंत आपल्याकडे दिवसाला 1 कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी पुरेसा साठा असेल. डिसेंबरपर्यंत संपूर्ण देशाचे लसीकरण पूर्ण होईल, असा विश्वास भार्गव यांनी व्यक्त केला. मुलांना होणाऱ्या करोना संसर्गावर आमचे लक्ष आहे. मोठ्या प्रमाणावर मुलांमध्ये करोनाची लक्षणंच दिसून येत नाही. त्यांना ससंर्ग होतो. पण त्यांच्यातील लक्षणं ही कमी असतात किंवा शून्य असतात.

    मुलांमधील संसर्गाने गंभीर स्वरुप घेतलेले नाही. पण संसर्गाने मुलांच्या वर्तनावर बदल होऊ शकतो. मुलांमध्ये करोनाचा प्रभाव वाढू शकतो. पण संसर्ग झालेल्या अतिशय कमी मुलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागते. आम्ही तयारी करत आहोत, असे नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले.