चपात्यांना थुंकी लावून लोकांना वाढायचा; Video viral होताच ग्राहकांनी ‘धू धू’ धुतले

वाढत्या कोरोनाच्या प्रसारात नियम अधिक कठोर करण्यात आले आहेत. देशभरातील अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे सरकारने चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान नागिरकांना अधिक सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केलं आहे. तर अनेक ठिकाणी मास्कचा वापर करणं अनिवार्य असून लग्नांमध्ये लोकांच्या संख्येत मर्यादा घालण्यात आली आहे.

    दिल्ली (Delhi).  वाढत्या कोरोनाच्या प्रसारात नियम अधिक कठोर करण्यात आले आहेत. देशभरातील अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे सरकारने चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान नागिरकांना अधिक सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केलं आहे. तर अनेक ठिकाणी मास्कचा वापर करणं अनिवार्य असून लग्नांमध्ये लोकांच्या संख्येत मर्यादा घालण्यात आली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वत्र काळजी घेतली जात असताना आता एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

    हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सना राग अनावर झाला आहे. लग्नामध्ये एक आचारी चपात्या तयार करीत असताना त्यावर थुंकत असल्याचं दिसून येत आहे. हा व्हिडिओ ट्वीटवर पोस्ट करण्यात आला असून यावर कारवाईची मागणी केली आहे. समोर आलेला व्हिडीओ मेरठमधील सएरोमा हॉटेलमधील असल्याचं समोर आलं आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर कारवाईच्या सुचना देण्यात आल्या आहेत. हाय हिल्स घालून ती धाव धाव धावली; कधीही पाहिला नसेल असा स्टंट, व्हिडीओ झाला तुफान व्हायरल

    याआधीही कोविड केअर सेंटरमध्ये हलगर्जीपणा केल्याच्या अनेक घटना व्हायरल झाल्या होत्या. त्यामुळे नागरिकांना अधिक सावधान राहणं गरजेचे आहे. सध्या शक्यतो लग्न, समारंभात जाणं टाळावं, किंवा अधिक काळजी घेण्याचं आवाहन सरकारकडून केलं जातं.

    या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता स्वयंपाकी प्रत्येक पोळीवर खाली तोंड करुन थुंकत आहे व कोणी आपल्याला पाहत आहे की नाही हे देखील तपासत आहे. अशा विचित्र माणसावर त्वरित कारवाई केली जावी अशी मागणी नेटिझन्सकडून केली जात आहे.