corona vaccine

चीनमध्ये तयार होत असलेल्या कोरोना लशीत डुकराचे मांस असल्याचे वृत्त आल्यानंतर रझा अकादमीने ही लस वापरण्यास विरोध केला आहे. भारत सरकारने डुकराचे मांस असलेल्या या चीनी लशीच्या खरेदीसाठी नोंदणी करू नये असे आवाहनच रझा अकादमीने केले आहे. तर, आता दुसरीकडे अमेरिकेत तयार होत असलेल्या कोरोनावरील लशीत गाईच्या रक्ताचा समावेश असल्याने ती भारतात वापरू नये, असे आवाहन अखिल भारत हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी केले आहे. हिंदू धर्म नष्ट करण्याचा हा आंतरराष्ट्रीय कट असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. गाईचे शेण व गोमूत्रापासून तयार केलेले औषध व लशीचा वापर हिंदू करू शकतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी लस विकासाची प्रक्रिया जाहीर करावी, म्हणजे लोकांचा धर्म बुडणार नाही असेही ते म्हणाले.

  • हिंदू महासभेच लस न घेण्याचं आवाहन

दिल्ली : देशात कोरोना लसीकरण सुरु होण्याआधीच नवा वाद निर्माण झाला आहे. मुस्लिमांनंतर आता हिंदूही पेटले आहेत. कोरोना व्हॅक्सिनमध्ये गाईचं रक्त असल्याचा दावा करण्यात येत आहे. हिंदू महासभेने थेट लस न घेण्याचं आवाहन केले आहे.

चीनमध्ये तयार होत असलेल्या कोरोना लशीत डुकराचे मांस असल्याचे वृत्त आल्यानंतर रझा अकादमीने ही लस वापरण्यास विरोध केला आहे. भारत सरकारने डुकराचे मांस असलेल्या या चीनी लशीच्या खरेदीसाठी नोंदणी करू नये असे आवाहनच रझा अकादमीने केले आहे.

तर, आता दुसरीकडे अमेरिकेत तयार होत असलेल्या कोरोनावरील लशीत गाईच्या रक्ताचा समावेश असल्याने ती भारतात वापरू नये, असे आवाहन अखिल भारत हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी केले आहे. हिंदू धर्म नष्ट करण्याचा हा आंतरराष्ट्रीय कट असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. गाईचे शेण व गोमूत्रापासून तयार केलेले औषध व लशीचा वापर हिंदू करू शकतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी लस विकासाची प्रक्रिया जाहीर करावी, म्हणजे लोकांचा धर्म बुडणार नाही असेही ते म्हणाले.

संपूर्ण जगाला कोरोना लशीची प्रतिक्षा आहे. अनेक कंपन्यांनी विकसीत केलेल्या लशींचे यशस्वी परिणाम पहायला मिळत आहेत. मात्र, आता विविध धार्मिक मुद्दे उपस्थित करत या लशींना विरोध केला जात आहे.