FASTag स्कॅन झाला नाही तर दुप्पट टोल भरु नका; फक्त हा ‘एक’ महत्वाचा document खिशात ठेवा आणि…

१५ फेब्रुवारीपासून संपूर्ण देशभरात FASTag ची अमंलबजावणी सुरु झाली आहे. त्यामुळे आता देशातील कोणत्याही राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करण्यासाठी तुमच्या गाडीवर Fasttag असणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक टोलनाक्यांवर FASTag स्कॅन होत नसल्याने वाहनचालकांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. तर, अनेक वाहनचालकांना दुप्पट टोल भरण्याचा फटका सहन करावा लागते आहे. FASTag नियावली संदर्भातील एक महत्वाचा डॉक्युमेंटमुळे वाहनचालकांची या त्रासातून सुटका होऊ शकते.

    दिल्ली : १५ फेब्रुवारीपासून संपूर्ण देशभरात FASTag ची अमंलबजावणी सुरु झाली आहे. त्यामुळे आता देशातील कोणत्याही राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करण्यासाठी तुमच्या गाडीवर Fasttag असणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक टोलनाक्यांवर FASTag स्कॅन होत नसल्याने वाहनचालकांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. तर, अनेक वाहनचालकांना दुप्पट टोल भरण्याचा फटका सहन करावा लागते आहे. FASTag नियावली संदर्भातील एक महत्वाचा डॉक्युमेंटमुळे वाहनचालकांची या त्रासातून सुटका होऊ शकते.

    हा महत्वाचा डॉक्युमेंट म्हणजे केंद्र सरकारच्या FASTag संदर्भातील जीआरची प्रत आहे. केंद्र सरकारच्या जीआरनुसार, तुमच्या फास्टॅग वॉलेटमध्ये पैसे असतील आणि टोलनाक्यावर हा FASTag स्कॅन झाला नाही तर तुम्हाला टोल भरण्याची गरज नाही. या जीआरची कॉपी दाखवून तुम्हाला दुप्पट टोल भरण्यापासून वाचता येईल.

    FASTag संदर्भातील हा जीआर 2018 सालीच निघाला होता. मात्र, तरीही FASTag स्कॅन न झाल्यास टोलनाक्यांवर वाहनचालकांकडून जबरदस्ती पैसे वसूल केले जातात. मात्र, या जीआरची प्रत दाखवून तुम्ही टोलनाक्यावर कायदेशीरपणे सूट मिळवू शकता.