यांना गहू व तांदूळ यातील फरक तरी माहिती आहे का? पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा केजरीवाल यांना सवाल

दिल्ली :  शेतकरी काद्यावरुन देशबऱात रणकंदान माजले आहे. केंद्र सरकारच्या कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांना देशभरातून मोठा पाठिंबा मिळाला.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेतली होती. या भेटीवरून पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी केजरीवाल यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

केंद्र सरकारने केलेले तिन्ही वादग्रस्त कायदे दिल्लीत लागू करण्यासाठी केजरीवाल यांनी अजिबात उशीर केला नाही. आता ते सार्वजनिक ठिकाणी स्वतःला शेतकऱ्यांचा सेवक म्हणून घेत आहेत. गहू व तांदूळ यातील फरक तरी त्यांना माहिती आहे का? असा सवालच सिंह यांनी केजरीवाल विचारला आहे. केजरीवाल यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या एक तरी काम दाखवावे असे आव्हानही सिंह यांनी दिले आहे.

तीन कृषी कायदे मागे घेण्यासाठी देशभरातील शेतकऱ्यांकडून विरोध होत आहे. याविरोधात भारत बंद पाळला असून, दुसरीकडे राजकीय कलगीतुराही बघायला मिळत आहे. आपचे अध्यक्ष व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल (७ डिसेंबर) सिंघू सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनस्थळी जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली होती.

आपण मुख्यमंत्री म्हणून नाही, तर सेवक म्हणून आलो आहे. संपूर्ण पक्ष, पक्षाचे आमदार, कार्यकर्ते आणि आपण स्वतः एक सेवक म्हणून शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी आलो आहे. शेतकरी आज संकटात असून, देशवासीयांचा कर्तव्य आहे की, शेतकऱ्यांसोबत उभं राहावं आणि त्यांची सेवा करावी,” असं केजरीवाल यांनी शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर म्हंटले होते.