विषाला एक्सपायरी असते का? शंकेचा खुलासा

चॉकलेट, किराणा, खाण्याचे अन्य तयार पदार्थ, औषधे, क्रीम, पावडर, लिपस्टिक सारखी कॉस्मेटिक्स अश्या अनेक वस्तू ठराविक काळात वापरल्या तरच सुरक्षित असतात, म्हणून त्यांना एक्सपायरी डेट दिली गेलेली असते. म्हणजे उत्पादन झाल्यापासून ठराविक तारखेच्या आत त्या वस्तू वापरल्या जाव्यात अशी अपेक्षा असते. अन्यथा या वस्तू खराब होतात किंवा त्यांचा परिणाम कमी होतो. विष या पदार्थासाठी सुद्धा एक्सपायरी असते का याची अनेकांच्या मनात शंका असते. त्याबाबत काही खुलासा येथे करत आहोत.

    दिल्ली : चॉकलेट, किराणा, खाण्याचे अन्य तयार पदार्थ, औषधे, क्रीम, पावडर, लिपस्टिक सारखी कॉस्मेटिक्स अश्या अनेक वस्तू ठराविक काळात वापरल्या तरच सुरक्षित असतात, म्हणून त्यांना एक्सपायरी डेट दिली गेलेली असते. म्हणजे उत्पादन झाल्यापासून ठराविक तारखेच्या आत त्या वस्तू वापरल्या जाव्यात अशी अपेक्षा असते. अन्यथा या वस्तू खराब होतात किंवा त्यांचा परिणाम कमी होतो. विष या पदार्थासाठी सुद्धा एक्सपायरी असते का याची अनेकांच्या मनात शंका असते. त्याबाबत काही खुलासा येथे करत आहोत.

    विष तयार करणे असो वा औषध तयार करणे असो. ते बनविण्यासाठी खास पॅटर्न वापरला जातो. विष हे विविध रसायने एकत्र करून बनविले जात असते. अनेक प्रकारची औषधे तयार करताना जसे विविध रसायने वापरली जातात आणि त्यांचा वापर विविध प्रकारे केला जातो. तसेच विषाच्या बाबतीत असते. विष तयार करताना कोणते रासायनिक पदार्थ वापरले गेले त्यावर त्याची एक्सपायरी ठरत असते.

    विषात किंवा औषधात वापरली गेलेली काही रसायने ठराविक काळानंतर निष्क्रीय बनतात. त्यामुळे विषावर परिणाम होणे अपरिहार्य असते. कुठले विष एक्स्पायर झाल्यावर परिणामकारक राहणार नाही अथवा कमी प्रभावी ठरेल हे त्यातील रसायनांवरून ठरते. प्रभाव कमी होणार असेल तर विषाचा डोस जास्त द्यावा लागतो. पण काही असले तरी विष पूर्ण निष्प्रभ होत नाही. त्यामुळे योग्य ती काळजी घेणे आवश्यक ठरते.