देशांतर्गत विमान प्रवास : ६६टक्के प्रवासी घटले; ५४०० कोटींचा तोटा

विमानतळ क्षेत्राचे मोठे नुकसान होण्याचे मुख्य कारण कोरोनामुळे लावण्यात आलेले प्रतिबंध होते. त्यामुळे प्रवाशांच्या संख्येत वार्षिक ६६ टक्के घट नोंदविण्यात आली.अहवालानुसार, २०२०- २१मध्ये प्रवासीसंख्येत ६१टक्के तर आंतरराष्ट्रीय प्रवासी संख्येत ८५टक्के घट होण्याची शक्यता आहे.

    दिल्ली: कोरोना साथरोगामुळे देशांतर्गत विमानतळ क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. एप्रिल २०२० ते मार्च २०२१ पर्यंत सेक्टरमध्ये शुद्ध तोटा ५४०० कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यासोबतच ३५०० कोटी रुपयांचा रोख रकमेचा तोटाही होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विमानतळ क्षेत्राचे मोठे नुकसान होण्याचे मुख्य कारण कोरोनामुळे लावण्यात आलेले प्रतिबंध होते. त्यामुळे प्रवाशांच्या संख्येत वार्षिक ६६ टक्के घट नोंदविण्यात आली.अहवालानुसार, २०२०- २१मध्ये प्रवासीसंख्येत ६१टक्के तर आंतरराष्ट्रीय प्रवासी संख्येत ८५टक्के घट होण्याची शक्यता आहे. तथापि पुढील आर्थिक वर्षात प्रवासी संख्येत १३० टक्के वाढ होण्याची शक्यता असून याद्वारे उद्योगाला जवळपास १९० कोटींचा फायदा होण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

    पुढील वर्षी वाढणार प्रवासीसंख्या
    विमान उद्योगत प्रवासी संख्येत वाढ होण्याचे कारण पुढील कालावधीत सामूहिक लसीकरण, व्यावसायिक प्रवासास दिलेली सूट, पर्यटन व्यवसायात आलेला वेग आदींचा समावेश असेल. सद्यस्थितीत प्रवासी संख्या प्री-कोविड लेव्हलच्या ८० टक्केपर्यंत पोहोचला आहे.

    ६१ टक्के तूट

    याबाबतचा अहवाल इक्रा या रेटिंग एजन्सीने तयार केला असून आर्थिक वर्ष २०२१ मध्ये या सेक्टरमध्ये ऑपरेटिंग इन्कममध्ये ६१टक्के तुटीसह ८४००कोटी रुपयांची तूट नोंदविली जाण्याची शक्यता आहे. जेव्हाकि ऑपरेटिंग तोटा जवळपास १७०० कोटी रुपये आणि ५४०० कोटी रुपयांचा शुद्ध तोटा होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.