कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका नाही, पण डेल्टा प्लसमुळे सगळ्यांची चिंता वाढली ; डॉ. रणदीप गुलेरिया यांचा मोठा खुलासा

डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, आपले वागणे कसे असेल? यावर सर्व गोष्टी अवलंबून आहे. जर लोकं सावध राहिले आणि लसीकरण चांगल्या प्रमाणात झाले, तर कोरोनाची तिसरी लाट येणार नाही किंवा आली तरी जास्त प्रभावित नसेल.

    कोरोनाची दुसरी लाट मंदावली असून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे आणि डेल्टा प्लसमुळे सगळ्यांची चिंता वाढली आहे. पण आता एम्सचे (AIIMS) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी कोरोना तिसरी लाट कशी येणार नाही आणि डेल्टा प्लस व्हेरियंटपासून सुरक्षित कसे राहायचे याबाबत सांगितले आहे.

    डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, आपले वागणे कसे असेल? यावर सर्व गोष्टी अवलंबून आहे. जर लोकं सावध राहिले आणि लसीकरण चांगल्या प्रमाणात झाले, तर कोरोनाची तिसरी लाट येणार नाही किंवा आली तरी जास्त प्रभावित नसेल.

    डेल्टा प्लस व्हेरियंटबाबत ते म्हणाले की, आतापर्यंत डेल्टा प्लस व्हेरियंट हा अधिक संसर्गजन्य, अधिक मृत्यूचे आणि प्रतिशक्ती कमी करण्याचे कारण असल्याचा डेटा नाही आहे. परंतु जर आपण कोरोना नियमांचे पालन केले तर आपण कोणत्याही व्हेरियंटपासून सुरक्षित राहू.