दिल्लीत धावणार चालकरहित मेट्रो – पंतप्रधान मोदी दाखविणार हिरवा कंदील

एअरपोर्ट एक्सप्रेस लाईनवर प्रवासासाठी पूर्ण परिचालन सुविधा असलेले नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सुद्धा लाँच मोदी लाँच करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत मेट्रोसाठी जे सार्वजनिक नियम होते त्यात चालकरहित मेट्रो ऑपरेशन व्यवस्थापनाचा समावेश नव्हता.

दिल्ली: सरत्या वर्षाच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील पहिल्या चालकरहित मेट्रोला हिरवा कंदील दाखविणार आहेत. येत्या २८ डिसेंबरला ही मेट्रो सुरु होईल असे अगोदरपासून सांगितले गेले होते. मात्र त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. जनकपुरी वेस्ट ते नोएडा बोटॅनिकल गार्डनला जोडणारी ३७ किमी मार्गाची ही मजेंटा लाईन देशातील स्वयंचलित चालकरहित मेट्रो आहे.
याचवेळी एअरपोर्ट एक्सप्रेस लाईनवर प्रवासासाठी पूर्ण परिचालन सुविधा असलेले नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सुद्धा लाँच मोदी लाँच करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत मेट्रोसाठी जे सार्वजनिक नियम होते त्यात चालकरहित मेट्रो ऑपरेशन व्यवस्थापनाचा समावेश नव्हता. त्यासाठी नियम बदलणे आवश्यक होते आणि त्यानुसार नवीन मेट्रो रेल्वे जनरल रुल्स २०२० तयार केले गेले आहेत.
दिल्ली मेट्रोची व्यावसायिक सुरवात २५ डिसेंबर २००२ पासून झाली त्यावेळी पहिल्या मेट्रो मार्गाचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते झाले होते. पहिल्या मार्गावर सहा स्टेशन होती. आता डीएमआरसी २४२ स्टेशन, १० लाईन्स ऑपरेट करते. दिल्लीत दररोज सरासरी २६ लाख प्रवासी मेट्रो प्रवास करतात.