medicine

नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीने औषध निर्मात्यांना वार्षिक किमतीत ०.५ टक्के वाढ करण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे वेदनाशमक, अँटीफ्लाइटिव्ह, कार्डियाक आणि अँटिबायोटिक्ससह आवश्यक औषधांच्या किमतीत एप्रिलपासून वाढ होण्याची शक्यता आहे.

    दिल्ली : देशात पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस सिलिंडरसह खाद्यपदार्थांचेही दर वाढल्यामुळे सामान्यांची स्थिती हलाखीची होत आहे. महागाईच्या या काळात आता सामान्य नागरिकांना औषधांसाठीही खिसा हलका करावा लागण्याची शक्यता आहे. औषधांच्या किमती २० टक्क्यांनी वाढणार आहेत. यामुळे आता आता आजारपणही परवडणार नाही.

    नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीने औषध निर्मात्यांना वार्षिक किमतीत ०.५ टक्के वाढ करण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे वेदनाशमक, अँटीफ्लाइटिव्ह, कार्डियाक आणि अँटिबायोटिक्ससह आवश्यक औषधांच्या किमतीत एप्रिलपासून वाढ होण्याची शक्यता आहे.

    सरकारने औषध निर्माता कंपन्यांना वार्षिक होलसेल प्राइस इंडेक्सच्या आधारावर किमतीत बदल करण्याची परवानगी दिली आहे. सरकारच्या वतीने २०२० साठी डब्ल्यूपीआयमध्ये ०.५ टक्के बद करण्यात आला आहे. तर, फार्मा इंडस्ट्रीने निर्मिती खर्चात १५ ते २०  टक्के वाढ झाल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे या कंपन्या २० टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.