The second wave is worse than the first: when the little ones are vaccinated; If you want to keep children away from the corona ...

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, गेल्या जवळपास 15 महिन्यांपासून ज्या मुलांना कोणत्याही संसर्गजन्य फ्लूची लागण झालेली नाही, अशा मुलांमध्ये त्याच्याशी लढण्यासाठीची रोगप्रतिकाशक्ती तयार झालेली नाही. त्यामुळे त्यांचे शरीर अशा पद्धतीच्या संसर्गजन्य विषाणूंशी लढण्यासाठी सक्षम नाही. तज्ज्ञांना आरएसव्ही या फुफ्फुसांच्या संसर्गाच्या धोक्याची शक्यता वाटत आहे.

    दिल्ली : कोरोना महामारीमध्ये सोशल डिस्टेन्सिंग पाळणे आणि मास्कचा वापर करणे यामुळे खरंतर अनेकांचे प्राण वाचले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मात्र, यामुळेच लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्याचे आता समोर आले आहे. इंग्लंडमधील काही तज्ज्ञांनी याबद्दलचा अभ्यास केला आहे.

    तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, गेल्या जवळपास 15 महिन्यांपासून ज्या मुलांना कोणत्याही संसर्गजन्य फ्लूची लागण झालेली नाही, अशा मुलांमध्ये त्याच्याशी लढण्यासाठीची रोगप्रतिकाशक्ती तयार झालेली नाही. त्यामुळे त्यांचे शरीर अशा पद्धतीच्या संसर्गजन्य विषाणूंशी लढण्यासाठी सक्षम नाही. तज्ज्ञांना आरएसव्ही या फुफ्फुसांच्या संसर्गाच्या धोक्याची शक्यता वाटत आहे.

    या संसर्गामुळे फुफ्फुसांना धोका निर्माण होतो आणि मृत्यूचा धोकाही संभवतो. एक वर्षे वयाच्या आतील मुलांना हा संसर्ग होऊ शकतो अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. त्यांनी असेही सांगितले की, करोना प्रादुर्भावाच्या पूर्वी अनेक लहान मुलांना अशा प्रकारचा संसर्ग झाला आहे. मात्र, कोरोनाकाळात मास्क आणि सोशल डिस्टेन्सिंग पाळल्यामुळे अशा संसर्गापासून मुलांचे संरक्षण झाले.

    मात्र, भविष्यात ज्यावेळी मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग या गोष्टींचे पालन करणे बंद होईल, त्यावेळी लहान मुलांना पुन्हा आरएसव्ही संसर्गाचा धोका उद्भवू शकतो. कारण, या कोरोनाकाळात मास्क, सोशल डिस्टेन्सिंगचे पालन केल्याने लहान मुलांना इतर संसर्गजन्य आजार झाले नाहीत आणि त्यामुळे त्या आजारांशी लढण्यासाठी त्यांच्या शरीराने रोगप्रतिकारशक्ती तयार केलीच नाही.

    हे सुद्धा वाचा