‘या’ नियमामुळे एप्रिलपासून तुमच्या हातात येणार कमी पगार

केंद्र सरकारच्या न्यू वेज कोड अंतर्गत कंपन्यां पे पॅकेज (Pay Package) रिस्ट्रक्चर करण्याची शक्यता आहे .एप्रिल महिन्यापासून कर्मचाऱ्यांचा पगार, पीएफ आणि ग्रॅच्यूटीच्या नियमात बदल होईल. सरकारने नवीन भरपाई नियम (New Compensation Rule) लागू करण्याची योजना आखण्यात आली आहे

    येत्या एप्रिल महिन्यापासून (New Compensation Rule) लागू केला जाऊ शकतो. त्यांनतर कर्मचाऱ्यांच्या हातात येणारी टेक होम सॅलरी कमी होऊ शकते. नवीन पगारासंबंधींच्या नियमांमुळे कर्मचाऱ्यांच्या सॅलरी स्ट्रक्चरमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या न्यू वेज कोड अंतर्गत कंपन्यां पे पॅकेज (Pay Package) रिस्ट्रक्चर करण्याची शक्यता आहे .एप्रिल महिन्यापासून कर्मचाऱ्यांचा पगार, पीएफ आणि ग्रॅच्यूटीच्या नियमात बदल होईल. सरकारने नवीन भरपाई नियम (New Compensation Rule) लागू करण्याची योजना आखण्यात आली आहे. गेल्यावर्षी संसदेत पारित झालेल्या वेज कोडचा भाग आहे.
    ज्यामुळे कंपनीच्या बॅलन्सशीटमध्ये बदल पाहायला मिळणार आहेत. या नवीन नियमात अलाउन्सची मर्यादा निश्चित आहे. हा एकूण सॅलरीच्या ५० टक्क्यापेक्षा जास्त नसेल. कंपनी आणि कर्मचारी दोघांच्या पीएफ कॉन्ट्रिब्यूशनमध्ये (PF Contribution) वाढ होईल. हे योगदान वाढल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या हातात कमी पगार येण्याची शक्यता आहे.
    या नव्या नियमांमुळे कर्मचाऱ्यांची सॅलरी स्लीप, प्रोव्हिंडंट फंड, ग्रॅच्यूटी, कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा पगार यामध्ये देखील बदल होईल. साधारणपणे या कंपन्यामध्ये नॉन अलाउंस हिस्सा कमी असतो. काहींमध्ये हा हिस्सा 50 टक्क्यांपेक्षाही कमी असतो या नियमामुळे फायदा असा होईल, की जरी तुमच्या हातात येणारा पगार कमी होणार असला तरी रिटायमेंट फंड (Retirement Fund) वाढेल. कंपन्यांच्या खर्चामध्ये वाढ होऊ शकते, कारण त्यांचे पीएफ आणि ग्रॅच्युटी योगदान वाढणार आहे