now leopard infected with corona, Quarantine done to museum animals

वर्षभरात बिबट्यांचे आणि व्याघ्र संवर्धनासाठी उचलण्यात आलेल्या महत्त्वाच्या पावलांमुळे देशातील वाघांची आणि बिबट्यांची संख्या वाढली आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि कर्नाटकात बिबट्यांची संख्या अधिक असल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र बिबट्याच्या संख्येत तीसऱ्या क्रमांकावर असल्याचे सांगितले जात आहे.

दिल्ली : केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात वर्षभरात ६० टक्के बिबट्यांची वाढ झाली आहे. २ वर्षाआधी बिबट्यांचा  (leopards ) आकडा १२ हजारावर होता. तर आता देशात बिबट्यांची संख्या १२ हजार ८५२ वर पोहचला आहे.

वर्षभरात बिबट्यांचे आणि व्याघ्र संवर्धनासाठी उचलण्यात आलेल्या महत्त्वाच्या पावलांमुळे देशातील वाघांची आणि बिबट्यांची संख्या वाढली आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि कर्नाटकात बिबट्यांची संख्या अधिक असल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र बिबट्याच्या संख्येत तीसऱ्या क्रमांकावर असल्याचे सांगितले जात आहे. एकूण बिबट्यांच्या संख्येपैकी ५ हजार २४० बिबटे प्रौढ आहेत. या बिबट्यांचे एकूण ५१ हजार ३३७ फोटो ओळख पटवण्यासाठी तपासण्यात आले आहेत.

सध्या देशात १२ हजार ८५२ बिबटे आहेत. देशात मध्यप्रदेशात सर्वाधिक ३ हजार ४२१ बिबट्यांची नोंद करण्यात आली आहे. तर दुसऱ्या स्थानावर कर्नाटक आहे. कर्नाटकात १ हजार ७८३ तर तीसऱ्या स्थानी महाराष्ट्रात १ हजार ६९० बिबट्यांची नोंद कऱण्यात आली आहे.