चार राज्यांत भूकंपांचे हादरे; राजस्थान, मेघालय, लडाख, हरयाणात दहशत

मेघालयात भूकंपाचा जबर धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता 4.1 रिश्टर स्केल होती व हा धक्का रात्री 2.10 च्या सुमारास जाणवला. या भूकंपाचा केंद्रबिंदू पश्चिम गारोहिल्स असल्याचे सांगण्यात आले. लेह लडाखमध्येही पहाटे 4.57 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 3.6 नोंदविण्यात आली.

    दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशाच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. मंगळवारी मध्यरात्रीही देशातील चार राज्यात भूकंपाच्या धक्क्यांमुळे दहशत पसरली होती. देशाच्या पूर्व-उत्तर भागात गेल्या तीन – चार दिवसांपासून हे हादरे बसत आहेत. मणिपूर, गुजरातसह अनेक राज्यात भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर राजस्थान, मेघालय, लडाख, हरयाणातही भूकंपाचे धक्के बसल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. सुदैवाने या भूकंपात कोणतेही नुकसान झाले नाही. काही दिवसांपूर्वीच मणिपूर आणि गुजरातमधील कच्छसह अन्य राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते.

    मेघालयात भूकंपाचा जबर धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता 4.1 रिश्टर स्केल होती व हा धक्का रात्री 2.10 च्या सुमारास जाणवला. या भूकंपाचा केंद्रबिंदू पश्चिम गारोहिल्स असल्याचे सांगण्यात आले. लेह लडाखमध्येही पहाटे 4.57 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 3.6 नोंदविण्यात आली.

    भूकंपाची सर्वाधिक तीव्रता राजस्थानातील बिकानेरमध्ये जाणवली. पहाटे 5.24 वाजताच्या सुमारास हे भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता 5.3 रिश्टर स्केल होती. पहाटे भूकंपाचे धक्के जाणवताच लोकांनी घराबाहेर धाव घेतली होती.