नेस्ले कंपनी उत्पादित मॅगी नुडल्स, नेसकॅफे आणि किटकॅट खाताय ; मग हे जरूर वाचा

नेस्लेने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेल्या अहवालात म्हटले आहे की आपण आपल्या कंपनीच्या उत्पादनांची गुणवत्ता वाढवण्यासाठी अनेक महत्त्वाच्या सुधारणा केल्या मात्र आपली उत्पादने ही आरोग्याच्या निकषांच्या गुणवत्तेची नाहीत. ग्राहकांकडून वाढती मागणी आणि नियामक संस्थांची गुणवत्तेची मागणी हा दबाव असतानाही आपण ते साध्य करू शकलेलो नाही. नेस्लेच्या ज्या उत्पादनांच्या गुणवत्तेची चर्चा या अहवालात झाली आहे त्या उत्पादनांच्या विक्रीतून कंपनीला जवळपास निम्मा म्हणजे ८४.३५ अब्ज डॉलरचा महसूल मिळतो.

    नवी दिल्ली: मॅगी नुडल्स, किटकॅट (KitKats)आणि नेसकॅफे (Nescafe) हे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते.नेस्ले कंपनीची ही उत्पादने जगभरात प्रसिद्ध आहे. मात्र याकंपनीकडून बनवण्यात येणारे खाद्य पदार्थ व पेये आरोग्य हानीकारक असल्याचा खुलासा जगप्रसिद्ध वर्तमानपत्र ‘फायनान्शियल टाईम्स’ने केला आहे. कंपनीकडून उत्पादित करण्यात आलेली ७० उत्पादने आरोग्याच्या व्याख्येत बसत नाहीत किंवा आरोग्याचे निकष पूर्ण करत नाहीत. जागतिक गुणवत्तेच्या निकषांनुसार पुरेसे मानांकन मिळवू शकलेली नाहीत. तर कॉफीसारखी विविध ९० टक्के पेय हे मानांकन मिळवू शकलेली नाहीत. इतरही असंख्य उत्पादनांच्या बाबतीत अशाच बाबींचा खुलासा झाला आहे. म्हणजेच नेल्सेची बहुसंख्य उत्पादने ही आरोग्यदायी नाहीत असाच निष्कर्ष यातून निघतो.

    नेस्लेने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेल्या अहवालात म्हटले आहे की आपण आपल्या कंपनीच्या उत्पादनांची गुणवत्ता वाढवण्यासाठी अनेक महत्त्वाच्या सुधारणा केल्या मात्र आपली उत्पादने ही आरोग्याच्या निकषांच्या गुणवत्तेची नाहीत. ग्राहकांकडून वाढती मागणी आणि नियामक संस्थांची गुणवत्तेची मागणी हा दबाव असतानाही आपण ते साध्य करू शकलेलो नाही. नेस्लेच्या ज्या उत्पादनांच्या गुणवत्तेची चर्चा या अहवालात झाली आहे त्या उत्पादनांच्या विक्रीतून कंपनीला जवळपास निम्मा म्हणजे ८४.३५ अब्ज डॉलरचा महसूल मिळतो.

    इंग्लंडमधील ‘फायनान्शियल टाईम्स’ने वतर्मानपत्राने दिलेल्या वृवृत्तानुसार नेस्लेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना २०२१च्या सुरूवातीला एक प्रेझेंटेशन देण्यात आले होते. त्या प्रेझेंटेशनमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार नेस्लेची फक्त ३७ टक्के उत्पादनांनाच ज्यात खाद्यपदार्थ आणि खास वैद्यकीय पोषक आहाराचाही समावेश आहे .