मतदान ओळखपत्र येणार मोबाईलवर, अशी आहे निवडणूक आयोगाची योजना

इतर अनेक सरकारी ओळखपत्रांप्रमाणे आता मतदार ओळखपत्रही डिजिटल करता येईल का, याबाबत सरकारी पातळीवर सध्या जोरदार तयारी सुरू असल्याचं समजतंय. विशेष म्हणजे प्रत्येकाचं मतदान ओळखपत्र हे जर त्याच्या मोबाईल नंबरशी कनेक्ट केलं, तर प्रत्येकाला त्याच्या मोबाईलवरच मतदान ओळखपत्राचा ऍक्सेस मिळू शकेल. त्यामुळे हे ओळखपत्र कायमस्वरुपी त्या व्यक्तीकडे राहिल.

आपली ओळख पटवणाऱ्या अनेक महत्त्वाच्या सरकारी कागदपत्रांपैकी मतदान ओळखपत्र हा एक महत्त्वाचा दस्तावेज असतो. मतदान ओळखपत्रामुळे आपल्याला प्रत्यक्ष मतदान करण्याचा अधिकार तर बजावता येतोच, मात्र त्याव्यतिरिक्त आपल्या ओळखीचा एक महत्त्वाचा पुरावा म्हणून या दस्तावेजाचा उपयोग होत असतो.

इतर अनेक सरकारी ओळखपत्रांप्रमाणे आता मतदार ओळखपत्रही डिजिटल करता येईल का, याबाबत सरकारी पातळीवर सध्या जोरदार तयारी सुरू असल्याचं समजतंय. विशेष म्हणजे प्रत्येकाचं मतदान ओळखपत्र हे जर त्याच्या मोबाईल नंबरशी कनेक्ट केलं, तर प्रत्येकाला त्याच्या मोबाईलवरच मतदान ओळखपत्राचा ऍक्सेस मिळू शकेल. त्यामुळे हे ओळखपत्र कायमस्वरुपी त्या व्यक्तीकडे राहिल.

असं झालं तर प्रत्यक्ष मतदान ओळखपत्र सोबत न बाळगता त्याची मोबाईलवरची डिजिटल कॉपीच ग्राह्य धरण्यात येईल. मोबाईल हँटसेट बदलला तरी नंबर तोच असल्यामुळे नव्या हँडसेटमध्येही मतदान ओळखपत्र ऍक्सेस करून डाऊनलोड करता येईल, अशी सोय नव्या प्रणालीत असल्याचं समजतंय. या प्रणालीला जर ग्रीन सिग्नल मिळाला, तर पुढील वर्षी होणाऱ्या काही राज्यांतील निवडणुकांसाठी याचा उपयोग केला जाण्याची शक्यता आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगानं याबाबत पावलं उचलायला सुरूवात केलीय. लवकरच सर्व राज्यांच्या निवडणूक आयुक्तांसोबत होणाऱ्या बैठकीत या विषयावर चर्चा होणार आहे. त्यात जर याला ग्रीन सिग्नल मिळाला, तर याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात होऊ शकते.

पुढील वर्षी होणाऱ्या आसाम, पश्चिम बंगाल, पुदुच्चेरी आणि केरळच्या विधानसभा निवडणुकीत हा प्रयोग केला जाऊ शकतो.