मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अभिनेत्री नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिसला ईडीचे समन्स, चौकशी होणार!

सुकेश चंद्रशेखर यांच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्री नोरा फतेहीला अंमलबजावणी संचालनालयाने साक्षीदार म्हणून बोलावले. ईडीने चौकशीच्या संदर्भात पाठवलेल्या नोटीसनंतर नोरा आज ED च्या कार्यालयात पोहोचली आहे. ईडी त्या सर्व लोकांवर बारीक नजर ठेवून आहे जे या प्रकरणाशी थेट किंवा अन्य मार्गाने जोडलेले असू शकतात.

    अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नोरा फतेहीला नोटीस बजावली असून त्यात दिल्ली येथील ईडीच्या कार्यालयात आज चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना नोराला करण्यात आली आहे. आता बॉलिवूड सेलिब्रिटीही सुकेश चंद्रशेखर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीच्या रडारवर आल्याचे चित्र दिसत आहे. ईडीने अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसनंतर आता नोरा फतेहीला नोटीस बजावली आहे. नोरा आज दिल्लीतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाली आहे.

    सुकेश चंद्रशेखर यांच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्री नोरा फतेहीला अंमलबजावणी संचालनालयाने साक्षीदार म्हणून बोलावले. ईडीने चौकशीच्या संदर्भात पाठवलेल्या नोटीसनंतर नोरा आज ED च्या कार्यालयात पोहोचली आहे. ईडी त्या सर्व लोकांवर बारीक नजर ठेवून आहे जे या प्रकरणाशी थेट किंवा अन्य मार्गाने जोडलेले असू शकतात. नोरा व्यतिरिक्त जॅकलिन फर्नांडिसलाही ईडीने समन्स बजावले आहे. जॅकलिनला 15 ऑक्टोबरला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

    याआधी जॅकलिनचीही ईडीने चौकशी केली होती. आधी ईडीला वाटले की, जॅकलिन या प्रकरणात सामील आहे, पण नंतर कळले की ती या प्रकरणाची व्हिक्टीम आहे. सुकेशने लीना पॉलच्या माध्यमातून जॅकलिनची फसवणूक केली होती. जॅकलीनने ईडीला दिलेल्या पहिल्या निवेदनात सुकेशशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती शेअर केली होती.

    या प्रकरणाबाबत बोलायचं झालं तर 200 कोटींच्या खंडणीपासून या प्रकरणाची सुरुवात झाली होती. तिहार जेलमध्ये बसलेल्या सुकेश चंद्रशेखर यानं एका उद्योजकाच्या पत्नीकडून ही रक्कम वसूल केली होती. त्यानंतर या प्रकरणी सुकेशची पत्नी लीना पॉलचाही सहभाग असल्याचं स्पष्ट झालं होतं. ईडीनं त्यांचीही चौकशी केली होती.